नवी दिल्ली : इस्रोने बुधवारी इतिहास रचला आहे. चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचले आहे. चांद्रयान-३ चे लँडर विक्रम बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. इस्रोच्या या यशाबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पासून विविध देशांच्या प्रमुखांपर्यंत, नासानेही चांद्रयानाच्या यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही इस्रोचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “चांद्रयान-3 ही अमृतकालची सर्वात मोठी उपलब्धी आहे. चंदा मामा आता आमचा आहे.”
अमृतकाल के प्रभातकाल में इस अविस्मरणीय उपलब्धि के लिए @isro के वैज्ञानिकों को पूरे देश की ओर से बधाई देता हूँ। #IndiaOnTheMoon #Chandrayaan3 pic.twitter.com/4giwuAC4nk
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) August 23, 2023
बुधवारी चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “या यशाबद्दल मी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करू इच्छितो. चंदा मामा आमचा झाला. अमरत्वाच्या पहाटे ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. आज एक मोठे स्वप्न पूर्ण झाले.”
#WATCH केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ने इसरो के तीसरे चंद्र मिशन चंद्रयान-3 की सफल लैंडिंग पर बधाई दी।
उन्होंने कहा, “चंद्रयान-3 अमृत काल की सबसे बड़ी उपलब्धि है। चंदा मामा अब हमारे हो गए हैं।” pic.twitter.com/MBGxPBpzIk
— ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. तेथून त्यांनी चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोच्या संशोधक आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.