नवी दिल्ली : कांद्याच्या विषयावरुन आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने 40 टक्के शुल्क आकारलं आहे. त्याविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. लासलगावसह कांद्याच्या अन्य बाजारपेठामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या सगळ्यामध्ये कांद्याच्या पीकाच नुकसान होण्याची शक्यता आहे.
आज धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा केली. केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
देवेंद्र फडणवीस सध्या जपानमध्ये
केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्यात आता श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे. कृषिमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना फोन केले व त्यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस सध्या जापान दौऱ्यावर आहेत.
श्रेयाची लढाई ?
थेट जपानमधून देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि पियुष गोयल यांना फोन केला. कांदा निर्यात शुल्कबाबत दोन्ही मंत्र्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गोयल यांची भेट घेण्यापूर्वीच फडणवीस यांची ट्विट करून माहिती दिली. यावरुन सरकारमध्ये पुन्हा राजकारण सुरु आहे ? श्रेय घेण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न ? अशी चर्चा सुरु झाली आहे.