पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितलं?; आघाडीत चाललंय काय?

निवडणुका आल्या की दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून केले जाते. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे. कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले.

पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितलं?; आघाडीत चाललंय काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 11:58 AM

बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. त्या दिशेने महाविकास आघाडीच्या जोरबैठकाही सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असा दावा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते बीडमध्ये मीडियाशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत घेऊन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन स्वतः धनंजय मुंडे यांनी केले. तसेच मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना शपथही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या विकासात राष्ट्रवादीचा वाटा

या 24 वर्षात राष्ट्रवादीला अनेक चढउतार बघावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल साडे सतरा वर्ष सत्तेत होता. त्यामुळे मधल्या काळात राज्याचा जो विकास झाला त्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा होता. ज्या ज्या वेळी सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा सामान्य माणसाचा आम्ही विकास केला. त्यामुळे राष्ट्रवादी हा आपला पक्ष असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी सध्या महाराष्ट्रात एक नंबर आहेच. पण येत्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी शपथ आम्ही घेतली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही

महाराष्ट्राच्या लढाईत राष्ट्रवादी एक नंबरला राहील. पण येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं देशातील राजकारणातील महत्त्व वाढणार आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीत युवक आणि युवकांचे प्रतिनिधी अधिक आहेत. हा तरुणांचा पक्ष आहे. बहुसंख्य तरुणाई राष्ट्रवादीत आहे. लोकप्रतिनिधीही तरुणच आहे. पवारांच्या नेतृत्वाखालील तरुणांचा आणि तरुण पक्ष आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीशिवाय राज्याला पर्याय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

तर आम्हीही उत्तर देऊ

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दाभोलकर यांच्या प्रकारेच पवार यांना मारू अशी धमकी देण्यात आली. त्याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने दाभोलकर यांच्या हत्येची जबाबदारी घेतली पाहिजे. तुमच्या पक्षातील लोक आमच्या नेतृत्वाला धमक्या देत असतील तर आम्ही देखील त्याला उत्तर देण्यास सक्षम आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
detail
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.