Video : नाशिकचं गंगापूर धरण 55 टक्के भरलं, पाहा व्हीडिओ…
नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर,दारणा,पालखेड धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) 55 टक्के भरलं आहे. त्यामुळे नाशिककरांचे (Nashik) यंदाचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येणार आहे. पाणी पातळी वाढत असल्याने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात […]
नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर,दारणा,पालखेड धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) 55 टक्के भरलं आहे. त्यामुळे नाशिककरांचे (Nashik) यंदाचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येणार आहे. पाणी पातळी वाढत असल्याने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दारणा धरणातून देखील 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
Published on: Jul 11, 2022 12:29 PM