नागपूर : नागपूरमधून (Nagpur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममधून (ATM) पाचशे रुपये विड्रॉल टाकल्यावर चक्क अडीच हजार रुपये निघत होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी पैसे (Money) काढण्यासाठी एटीएमबाहेर गर्दी केली. हा प्रकार नागपूरमधील खापरखेडा गावात घडला आहे. खापरखेडा गावातील शिवा कॅम्पेक्समध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली होती. नागरिकांनी विड्रॉलसाठी पाचशे रुपये टाकले असता त्यांना चक्क अडीच हजार रुपये मिळत होते. विशेष म्हणजे जी रक्कम एटीएममधून विड्रॉल झाली त्याचा कोणताही एमएमएस ग्राहकांच्या मोबाईलवर आला नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. त्यानंतर पोलिसांनी या एटीएमचे शटर बंद केले. तोपर्यंत अनेकांनी या एटीएममधून पाचशे रुपयांच्या मोबदल्यात अडीच हजारांची रक्कम काढली होती.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या खापरखेडा गावातील शिवा कॅम्पेक्समध्ये अॅक्सिस बँकेचे एक एटीएम आहे. या एटीएममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने या एटीएममधून पाचशे रुपयांऐवजी अडीच हजार रुपये ग्राहकांना मिळत होते. ही बातमी वेगाने गावात पसरली आणि नागरिकांनी पैसे काढण्यासाठी अॅक्सिस बँकेच्या एटीएमबाहेर गर्दी केली. एटीएमबाहेर मोठी रांग लागली. या एटीएममधून अनेकांनी अडीच हजार रुपये काढले. ज्यांनी पैसे काढले त्यांना पैसे कट झाल्याचा एसएमएस देखील आला नाही. याच एटीएम शेजारी इतर बँकांचे देखील एटीएम आहेत. मात्र याचा एटीएमबाहेर झालेली गर्दी पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना संबंधित प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित एटीएम ताक्ताळ बंद केले. मात्र तोपर्यंत अनेकांनी पैसे काढले होते.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की एटीएममध्ये काहीतरी तात्रिक बिघाड झाला असावा. त्यामुळे नागरिकांना पाचशे रुपयांऐवजी अडीच हजार रुपये मिळत होते. दरम्यान ज्या-ज्या लोकांनी या एटीएममधून पैसे काढले, त्यांचा डाटा गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यांच्याकडून अतिरिक्त सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहेत. घटना कळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेत हे एटीएम बंद केले होते. मात्र तोपर्यंत अनेकांनी पैसे काढले असावेत असा अंदाज आहे.