Mumbai: पुढच्या वर्षीपासून पनवेल ‘शटल’ सेवेचा श्रीगणेशा! 45 टक्के काम पूर्ण, कुर्ला एलिवेटेड स्थानकातून होणार प्रारंभ

| Updated on: Jul 04, 2022 | 8:29 AM

मुंबई सीएसएमटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठीचे कनेक्शन म्हणून कुर्ला हार्बरचे एलिवेटेड स्थानक बांधण्यात येत आहे. यासाठी हार्बरच्या कुर्ला स्थानकातील सध्याचे फलाट क्रमांक 7 आणि 8 हे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहेत.

Mumbai: पुढच्या वर्षीपासून पनवेल शटल सेवेचा श्रीगणेशा! 45 टक्के काम पूर्ण, कुर्ला एलिवेटेड स्थानकातून होणार प्रारंभ
भारतीय रेल्वे
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: टिळक नगर स्थानकाच्या दक्षिण बाजूकडून ते कुर्ला स्थानकाच्या दक्षिण बाजूकडे 1.1 कि.मी.चा एलिवेटेड मार्ग उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. येथे एकूण तीन एलिवेटेड फलाट उभारण्यात येणार आहेत. अप आणि डाऊन तसेच एक अतिरिक्त टर्मिनल फलाट उभारण्यात येत आहे. कुर्ला ते पनवेल (Kurla-Panvel) शटल लोकल दोन्ही दिशांना चालविण्यासाठी या एक्स्ट्रा टर्मिनल फलाटाचा वापर होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम कुर्ला-परळ (Kurla-Parel) आणि सीएसएमटीपर्यंत (CSMT) लटकले आहे. मुंबई सीएसएमटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठीचे कनेक्शन म्हणून कुर्ला हार्बरचे एलिवेटेड स्थानक बांधण्यात येत आहे. यासाठी हार्बरच्या कुर्ला स्थानकातील सध्याचे फलाट क्रमांक 7 आणि 8 हे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहेत.

 वडाळा ते कुर्ला नवा मालगाडीचा मार्ग बांधला जात आहे

सध्या असलेल्या कुर्ला हार्बर स्थानकाच्या सर्व ॲक्टिव्हिटी एलिवेटेड फलाटावरच शिफ्ट होणार असून तेथे तिकीट घर आणि इतर प्रवासी सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच ट्रॉम्बेला आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला जाणाऱ्या येणाऱ्या मालगाड्यांसाठी सध्या हार्बरचा कुर्ला ते वडाळा मार्ग वापरला जातो. त्याऐवजी वडाळा ते कुर्ला नवा मालगाडीचा मार्ग बांधला जात आहे. त्यामुळे हार्बरची वाट अडवली जाण्याचा प्रकार बंद होणार आहे.

हार्बरचा पाचव्या व सहाव्या मार्गिकांसाठी 890 कोटी रुपयांचे बजेट मंजूर

  • कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या 17.60 कि.मी. च्या मार्गिकेसाठी 890 कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे.
  • मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान प्रायव्हेट जागा, झोपड्या आणि बीएमसीची जागा, दादर व परळ तसेच भायखळा व सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान खासगी जागा, माटुंगा व शीवदरम्यानच्या झोपड्या, तर शीव-कुर्ला व विद्याविहार दरम्यान खासगी जागा ताब्यात घ्यावी लागणार

45 टक्के काम पूर्ण

या एलिवेटेड मार्गाला अंदाजित १२५ कोटी रुपयांचा खर्च येणार असून याची पहिली डेडलाइन १३ जानेवारी २०१९ ही होती, परंतु आतापर्यंत चार ते पाच वेळा ही डेडलाइन पुढे गेली आहे. सध्या या मार्गिकेचे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून २०२३ अखेर हा मार्ग पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हा मार्ग बांधण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी गृहीत धरण्यात आला होता.

  1. प्रोजेक्टची अंदाजित किंमत 125 कोटी
  2. प्रकल्प पूर्ण होण्याचा काळ 3 वर्षे
  3. एलिवेटेड कॉरीडॉरची लांबी 1.1 कि.मी.
  4. एलिवेटेड फलाटांची एकूण संख्या 3

हार्बरच्या प्रवाशांना पी. डिमेलोचा वळसा हार्बर लाईन सॅण्डहर्स्ट रोड येथून वळवून पी. डिमेलो रोडवर नेण्याचा आणि तिथेच ती समाप्त करण्याचीही योजना आहे. तसेच सॅण्डहर्स्ट रोड ते सीएसएमटी हार्बर लाइनचे दोन फलाट पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी वापरण्याची योजना आहे.