मुंबई : मध्य रेल्वेची (Central Railway Local News) वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांचा (Central Railway Local Service) खोळंबा झालाय. नेहमीच्या ठरलेल्या वेळेऐवजी लोकल (Mumbai Local News) सेवा उशिराने सुरु असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. सकाळ सकाळीच मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचं वेळापत्रक कोलमडलं. नेमक्या लोकल उशिराने का सुरु आहेत, हे कळायलाही प्रवाशांना काही मार्ग नव्हता.
सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या अनेकांना मध्य रेल्वेच्या उशिराने सुरु असलेल्या लोकल सेवेचा फटका बसला. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश लोकल या जवळपास 20 ते 25 मिनिट उशिराने धावत होत्या.
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा नेमकी का विस्कळीत झाली, असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे. मध्य रेल्वे मार्गावर धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत आहेत. त्याचा फटका मध्य रेल्वेवरील लोकल मार्गावरही झाला आहे.
जलद मार्गासह धीम्या मार्गावरील वाहतूकदेखील संथ गतीने सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. धुक्क्यामुळे लोकल सेवा नियमित वेगापेक्षा कमी वेगाने सुरु असल्यामुळे वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. दरम्यान, काही लोकल रद्दही करण्यात आल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला.
ऐन सकाळच्या सुमारास लोकल सेवेवर परिणाम झाल्यामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडालीय. धुक्क्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरली लोकलचं वेळापत्रक कोलडमलंय. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.