मुंबई: महिना झाला राज्यात मान्सूनचं (Maharshtra Monsoon) आगमन झालंय. सोमवारपासून पावसाने चांगलाच जोर धरलाय. मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावलीये. काल रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरातील बांद्रा, अंधेरी, गोरेगांव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर अंधेरी सबवे, मालाड सबवे सह अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत. RMC Mumbai ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3-4 तासात मुंबई ठाणे रायगड आणि पालघरच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागातही मध्यम ते तीव्र पावसाच्या सरी बरसणार आहेत.
Mumbai Rainfall update:
Intense spells of rainfall very likely over parts of Mumbai Thane Raigad and Palghar during next 3-4 hours. Ghat areas of Pune and Satara also to receive moderate to intense spells of rain. pic.twitter.com/602iVf0zMZ— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 6, 2022
हवामान खात्यानं पावसाबाबत अचूक अंदाज वर्तविल्याचं दिसून येतंय. जुलै महिन्यात हवामान विभागाने मुंबईच नाहीतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुंबईसह उपनगरात आणि कोकणात कोसळधारा झाल्या आहेत. उर्वरित राज्यातही पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईसह उपनगरात पावसामध्ये सातत्य कोकण आणि मुंबईमध्ये वरुणराजाची कृपादृष्टी ही राहिलेली आहे. आतापर्यंत या विभागात पावसाचे सातत्य राहिले आहे तर सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उपनगरांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई उपनगरात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वांद्र्यासह काही भागात अद्यापही पाणी साचले आहे. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मुसळधार पावसामुळे परिसरास तलावाचे स्वरूप आले असून रस्ते जलमय झाले आहेत. वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर कायम असून वसई विरारमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. विरारच्या विवा कॉलेज परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. पनवेल परिसरातसुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून या सगळ्याच भागात जोराचा पाऊस आहे.