आम्ही काय गोट्या खेळायला आलो का? पागलबिगल आहोत का? सुरेश धस सभागृहात प्रचंड संतापले

| Updated on: Jul 25, 2023 | 9:15 PM

भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आज सभागृहात प्रचंड संतापले. आम्ही काय गोट्या खेळायला आलो आहोत का? आम्ही काय पागल आहोत का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला.

आम्ही काय गोट्या खेळायला आलो का? पागलबिगल आहोत का? सुरेश धस सभागृहात प्रचंड संतापले
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आज सभागृहात प्रचंड संतापले. विधान परिषदेत शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल चर्चा सुरु होती. या विषयांवर चर्चा होणार याची कल्पना सत्ताधारी नेत्यांनाही होती. मात्र तरीही कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि संबंधित अधिकारी हे सभागृहात पोहोचलेच नाहीत. त्यावरुन भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट सरकारला प्रश्न विचारला. आम्ही सभागृहात काय गोट्या खेळायला आलोय का? असा सवाल त्यांनी संतापात केला. यावेळी सभागृहातील काही आमदारांनी सुरेश धस यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.

“सभापती महोदय, आमच्याकडे गाडी नसली तरी टॅक्सीकरुन आम्ही इथपर्यंत सभागृहात वेळेवर येतो. सभागृहात आम्ही तीन-तीन जिल्ह्यातून निवडून येतो. विधानसभेतून काही माणसं निवडून येतात. आम्ही इथे येवून बसायला काय पागलबिगल आहोत का? मंत्री नाहीत, अधिकारी नाहीत. दहा मिनिटे लेट आले. त्यांना समज दिली पाहिजे. हा आमचा हक्क आहे”, असं सुरेश धस म्हणाले.

“या सर्वोच्च सभागृहामध्ये आम्ही काय गोट्या खेळायला येतो का? कोण अधिकारी आले आहेत ते सांगाना. इथे कृषी विभागाचा जबाबदार अधिकारी कोण आहे ते सांगाना. आत्महत्या सारखे विषय आहेत. आता त्या ताई बोलल्या. जानकर साहेब बोलणार आहेत. आपण वेळ कशासाठी वाढवून घेतली? दरवेळेस काही ना काही कारण सांगितलं जातं”, अशी उद्विग्नता सुरेश धस यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

विधान परिषदेचे सभापती आणि आमदार सुरेश धस यांच्यातलं संभाषण

विधान परिषदेचे सभापती : आपण सांगितल्याप्रमाणे मंत्री महोदय येत आहेत. त्यांना आपण 12 मिनिटे दिली आहेत.

सुरेश धस : सभागृह तहकूब करा, असं मी अजिबात म्हणार नाही. सभागृहाचा वेळ वाया घालवू नका

विधान परिषदेचे सभापती : तुम्ही, मी सांगतो ते ऐका. आपण त्यांना 12 मिनिटे का दिले? हा तुमचा एक प्रश्न आणि दुसरं मंत्री महोदय थोड्याच वेळात येत आहेत. तोपर्यंत जानकर बोलतील. मग तुमच्यावेळेस मंत्री बोलतील

सुरेश धस : अधिकारी वेळेवर आले नाही. आपण समज दिली पाहिजे. आम्ही सभागृहात समज हा शब्द जबाबदारीने वापरतोय. समज दिली पाहिजे.

सभापती : हो.. हो… आपण मंत्री महोदयांना समज देऊ. अधिकाऱ्यांनाही समज देऊ