मुंबई: जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की भारतातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान हा सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय असल्याने मुलाखतीच्या फेऱ्यांचा विचार केला असता उमेदवारांची क्षमता मोजली जाते आणि त्याचे मोजमाप करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रश्न विचारणे. आता या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर येत असतील तर उत्तम. जर ही उत्तरे येत नसतील तर हरकत नाही, एकदा नजरेखालून घाला.
प्रश्न 1 – जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
उत्तर – सहारा वाळवंट.
प्रश्न 2 – भारतातील सर्वाधिक वने असणारे राज्य कोणते आहे?
उत्तर – मध्य प्रदेश हे भारतातील सर्वाधिक वने असणारे राज्य आहे.
प्रश्न 3 – रावणाचे मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थानमध्ये रावणाचे मंदिर आहे.
प्रश्न 4 – भारतात डाळींचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
उत्तर – भारतात मध्य प्रदेशात डाळींचे उत्पादन घेतले जाते.
प्रश्न 5- दूध उत्पादनात भारताचे स्थान काय आहे?
उत्तर – दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
प्रश्न 6 – बाईकचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर – बाईकचा शोध जर्मनीने लावला.
प्रश्न 7: सूर्यात किती पृथ्वी सामावू शकतात
उत्तर – 13 लाख पृथ्वी सूर्यात सामावू शकतात.
प्रश्न 8 – प्लास्टिक सर्जरीचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर – भारत