मुंबई: जेव्हा स्पर्धा परीक्षेची चर्चा होते, तेव्हा त्यात सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतात. मग ती परीक्षा शाळा महाविद्यालयातील प्रवेशासाठी असो किंवा सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी लेखी परीक्षा असो किंवा मुलाखतीसाठी. कुठलीही परीक्षा देताना जनरल नॉलेज हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भातील ज्ञान वाचनाने वाढते. तुम्हाला इतर विषय वाचायची, पुस्तके, वर्तमानपत्र वाचायची सवय असावी. आम्ही तुम्हाला खाली काही प्रश्न देतोय ज्याची उत्तरे तुम्हाला येतायत का बघा. हे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत, तुम्हाला याची उत्तरं येत असतील तर ठीक आणि नसतील येत तर खाली दिलेली उत्तरे वाचा.
प्रश्न – भारतातील सर्वात जास्त विमानतळ कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर – भारतात गुजरातमध्ये सर्वाधिक विमानतळ आहेत.
प्रश्न – भारतातील कोणते राज्य मिरचीचे सर्वाधिक उत्पादन करते?
उत्तर – मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात होते.
प्रश्न – फ्रिजमध्ये ठेवल्यास कोणते फळ विष बनते?
उत्तर – कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्यास विष बनते.
प्रश्न – खिचडी हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय अन्न आहे ?
उत्तर – भारताचे राष्ट्रीय अन्न खिचडी आहे. जो पूर्व पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारताचा आहार आहे. जो भारतात सर्वत्र आढळतो.
प्रश्न – भारतातील कोणते राज्य पेरूचे सर्वाधिक उत्पादक राज्य आहे?
उत्तर – यूपीमध्ये पेरूचे सर्वाधिक उत्पादन होते.
प्रश्न – काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त मानली जाते?
उत्तर – कापूस पिकासाठी काळी माती उपयुक्त मानली जाते.
प्रश्न – कोणत्या देशात एकही चित्रपटगृह नाही?
उत्तर – भूतानमध्ये एकही चित्रपटगृह नाही.
प्रश्न – झाडावरून तोडल्यानंतर कोणते फळ पिकते?
उत्तर – चिकू हे झाडावरून तोडल्यानंतर पिकणारे फळ आहे.