इथे चिंगम खाल तर तुरुंगात जाल! जगातील या देशात चिंगमवर बंदी, जाणून घ्या का?

| Updated on: Aug 22, 2023 | 5:30 PM

हा जगातील असा देश आहे जिथे विचित्र नियम आहे, येथे बंदी घालण्यात आली आहे. चिंगम इथे खाल्लं जात नाही आणि विकलं जात नाही. चला तर मग जाणून घेऊया इथे चिंगमवर बंदी का घालण्यात आली

इथे चिंगम खाल तर तुरुंगात जाल! जगातील या देशात चिंगमवर बंदी, जाणून घ्या का?
Follow us on

मुंबई : काही देशात विचित्र नियम असतात. ज्या आपल्याला ऐकायला देखील विचित्र वाटतात. पण हे नियम तेथील देशासाठी कदाचित आवश्यक असू शकते. एखाद्या गोष्टीवर बंदी घालावी लागते. यामागचं कारण काही तरी गंभीर असल्याशिवाय असू शकत नाही. असाच एक विचित्र नियम म्हणजे चिंगमवर असलेली बंदी. सिंगापूर हा असा देश आहे ज्याने चक्क चिंगमवर बंदी घातली आहे.

सिंगापूरमध्ये चिंगमवर बंदी आहे. येथे लोकांना चिंगम खाता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया इथे चिंगमवर बंदी का घालण्यात आली

सिंगापूर हा आज अतिशय समृद्ध देश आहे. त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील लोकं खूपच शिस्तप्रिय आहेत. शिस्त राखण्यासाठी येथे असे अनेक कडक नियम आहेत. कदाचित जे आपल्यासाठी सामान्य असेल. देशाचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू (1st PM) यांना देशाचा वेगाने विकास व्हावा अशी इच्छा होती. त्यांच्या मते लोकांमध्ये जर शिस्त नसेल तर देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अनेक निर्बंध लादले होते. चिंगमवरील बंदी देखील त्यापैकीच एक होती.

चिंगमवर बंदी का घालण्यात आली?

चिंगम खाणारे हे अनेकदा घाण पसरवतात. चिंगम खाऊन कुठे ही फेकायचे. कधी रेल्वे तर कधी बसच्या सीट खाली टाकायचे. चिंगम चघळायचे आणि कुठेही थुंकायचे. जे लोकांच्या पायाखाली चिकटून रहायचे. चिंगममुळे अशा प्रकारे देशात साफसफाई करताना अडचणी येत होत्या, त्यामुळे येथे चिंगमवर बंदी घालण्यात आली होती.

चिंगम वरील ही बंदी 1992 मध्ये घातली गेली होती. त्यानंतर 2004 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. पण नंतर पुन्हा हा कायदा सिंगापूरमध्ये दुसर्‍यांदा लागू करण्यात आला, जो अजूनही सुरू आहे, परंतु येथे तुम्ही फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच चिंगम खाऊ शकता.

अवैध चिंगम खाणाऱ्यांना दंड

देशात कुठे ही चिंगम थुंकल्यास मोठा दंड आहे. पहिल्यांदा हा गुन्हा केला तर 74,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, परंतु बेकायदेशीरपणे चिंगम खाताना पकडले गेलात तर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते.