मुंबई: पावसाळ्याच्या दिवसात वांगीची भाजी भरपूर असते. वांगे खाण्याचे देखील खूप फायदे आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वांग्याच्या सेवनाने रक्तातील साखर, हृदयविकारासह अनेक जुनाट आजारांना फायदा होतो. असे काही लोक आहेत ज्यांनी वांगी खाणे टाळले पाहिजे. तसे न केल्यास त्यांना फायद्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी वांगी टाळावी.
ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी वांग्या पासून दूर राहावे. असे न केल्यास मूळव्याधाची समस्या वाढू शकते.
ज्या लोकांना बरेचदा पोटात त्रास होतो त्यांनी वांगी खाणे टाळावे. असे केल्याने गॅस-ॲसिडिटी वाढू शकते, ज्यामुळे काहीही करणे अवघड होऊ शकते.
ज्या लोकांना रक्ताच्या कमतरतेची तक्रार आहे त्यांनी चुकूनही वांगी खाऊ नये. असे केल्याने शरीरात रक्त निर्मितीत अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे शरीर कमकुवत होते.
त्वचेच्या ॲलर्जीने त्रस्त असलेल्या लोकांनीही वांगी खाणे टाळावे. अशा लोकांसाठी वांग्याची भाजी तोट्याचा सौदा ठरू शकते. यामुळे त्यांची ॲलर्जी वाढू शकते.
किडनी स्टोनची वेदना एखाद्याला अस्वस्थ करू शकते. ज्यांना ही समस्या आहे त्यांनी वांगी अजिबात खाऊ नये. वांगीमध्ये आढळणाऱ्या ऑक्सलेटमुळे स्टोनची समस्या वाढू शकते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)