मुंबई : सुट्ट्या जोडून येणार आहेत असं दिसलं की, बॉलिवूडमध्ये त्या आधी चित्रपट रिलीज करण्यासाठी योग्य दिवस मानला जातो. खासकरून 15 ऑगस्टला बॉलिवूडचा एक तरी बिग बजेट चित्रपट रिलीज होतो.कारण या दिवसाला विकेंड जोडून आला की चांगला धंदा होतो अशी आशा प्रोड्युसर्स आणि गुंतवणूकदारांना असते. त्यामुळे सोलो चित्रपट रिलीज करण्याची निर्मात्यांची धडपड असते. पण या वर्षी 15 ऑगस्ट आधी दोन बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. अक्षय कुमारचा ओह माय गॉड 2 आणि सनी देओलचा गदर 2 चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील दोन मोठे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार असून त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर दिसून येईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. पण असं असताना एकाच दिवशी दोन चित्रपट रिलीज करण्यासाठी का धडपड असते? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
गदर चित्रपटाशी निगडीत सूत्रानुसार, चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय अभिनेते नाही तर प्रोड्युसर आणि डिस्ट्रिब्यूटर्स घेतात. गदर 2 चित्रपटाला 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा दिवस निवडला आहे. दुसरीकडे, कोरोना कालावधीत अनेक चित्रपटांचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. पण दोन वर्षांच्या ब्रेकमुळे सर्वच गणित फिस्कटलं आहे. त्यामुळे काही चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आले. तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षापूर्वी चित्रिकरण केलेला चित्रपट रिलीज करण्यासाठी अजून उशीर केल्यास तोटा होऊ शकतो. त्यामुळे एकाच दिवशी बॉलिवूडचे चित्रपट रिलीज होत आहेत.
Sab faatak, sab signal yeh log tod aaye…..????#MainNiklaGaddiLeke is out, tune in now.
? – https://t.co/MwG9nDTajH#Gadar2 aa rahi hai bade parde par ? lagane iss Independence Day! ??
Cinemas mein 11th August se ?️@ZeeStudios_ @Gadar_Official @iamsunnydeol pic.twitter.com/1FbTKaTtdB— Luv S Sinha (@LuvSinha) August 3, 2023
बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या चित्रपटमध्येच क्लॅश होतात असं नाही तर दक्षिणात्य चित्रपटाचंही आव्हान असतं. प्रादेशिक चित्रपटही बॉलिवूडच्या चित्रपटांना तगडं आव्हान देतात. जर कंटेंट चांगला असेल तर दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2001 मध्ये गदर आणि लगान चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाला होता. तेव्हा दोन्ही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पण कंटेंट नसेल तर दोन्ही चित्रपट एकाच वेळी आपटू शकतात.
जिरो आणि केजीएफ 1, काबिल-रईस, दिलवाले-बाजीराव मस्तानी यासारखे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. गदर 2 आणि ओह माय गॉड 2 या दोन्ही चित्रपटांमद्ये आता कोण बाजी मारतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.