Tamannaah Bhatia: सुरक्षाकडं तोडत चाहत्याने घेतली तमन्ना भाटिया हिच्याकडे धाव, समोर येताच केलं असं काही…

| Updated on: Aug 08, 2023 | 9:51 PM

तमन्ना भाटिया हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक चाहता सुरक्षाकडं भेदून थेट तिला भेटण्यासाठी गेला आणि...

Tamannaah Bhatia: सुरक्षाकडं तोडत चाहत्याने घेतली तमन्ना भाटिया हिच्याकडे धाव, समोर येताच केलं असं काही...
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला भेटण्यासाठी चाहत्याने सुरक्षाकडं भेदलं आणि तिच्यासमोर जाताच...
Follow us on

मुंबई : चित्रपट कलाकारांचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिथे जातील तिथे चाहत्यांचा गराडा पाहायला मिळतो. त्यामुळे चाहत्यांची गर्दी पाहता सार्वजनिक ठिकाणी कलाकारांभोवती सुरक्षेकडं कायम पाहायला मिळतं. पण अनेकदा चाहते सुरक्षाकडं भेदून आपल्या आवडत्या कलाकराची भेट घेतात. अनेकदा अनुचित प्रकार घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षक चाहत्यांना शक्यतो आसपासही फिरकू देत नाही. पण चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. असंच काहिसा प्रकार तमन्ना भाटिया हिच्यासोबत घडला. केरळमध्ये एका कार्यक्रमासाठी जात होती. तेव्हा एका चाहत्याने सुरक्षाकडं तोडत थेट तिच्या दिशेने धावत गेला.सुरक्षारक्षकांना काही कळायच्या आतच तो तिच्यापर्यंत पोहोचला होता. इतकंच काय तर तमन्ना भाटिया हिचा हात पकडला.

चाहत्याला तमन्नाने अशा पद्धतीने केलं हँडल

सुरक्षारक्षकांनी थेट तमन्ना भाटियाच्या दिशेने धाव घेतली आणि त्या चाहत्याला पकडलं. पण इतकं होऊनही चाहता तिला भेटण्यासाठी हट्ट धरत होता. त्याचा त्रागा पाहून तमन्नाने सुरक्षारक्षकांना त्याला सोडण्यास सांगितलं. तमन्ना भाटियाने त्या चाहत्यासोबत हस्तांदोलन केलं आणि एक सेल्फीही घेतला.

तमन्नाच्या अशा वागण्याने चाहता भलताच खूश झाला. जाताना अभिनेत्री तमन्ना हिने त्याला गुडबायही केलं. यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा कडक करण्यात आली. चित्रपट कलाकारांसोबत असं करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तर चाहते घराबाहेर तासंतास उभे राहतात. एक झलक पाहून आपलं समाधान करून घेतात. कधी कधी तर गाडीचा पाठलागही करतात.

तमन्ना भाटियाचे अपकमिंग चित्रपट

तमन्ना भाटिया हिचं गाणं सध्या सोशल मीडियावर जबरदस्त हीट झालं आहे. सिग्नेचर स्टेप्सचे अनेक रील्स व्हायरल होत आहेत. तमन्ना भाटिया बाहुबली, बाहुबली 2, केजीएफ आणि लस्ट स्टोरीज 2 चित्रपटात झळकली आहे. तसेच तिचा आगामी चित्रपट दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याच्यासोबत आहे. जेलर चित्रपटात ही जोडी दिसणार आहे.