मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ही सोशल मीडियावर सदैव चर्चेत असते. वारंवार काही ना काही कारणांमुळे ती सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेते. तिचे कपडे, बोल्ड आऊटफिट्स असो किंवा काही वक्तव्य असतो, त्यांची इंटरनेटवर सतत चर्चा होत राहते. तिचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. शर्लिनचे नाव अनेक वादांत (contrversy) सापडले असले तरी ती मात्र बिनधास्तपणे तिचं आयुष्य जगते.
आता पुन्हा शर्लिनचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याची बरीच चर्चाही होत आहे. खरंतर शर्लिन हिने लग्न करण्यास नकार दिला आहे. आता ही कोणाशी लग्न करणार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ? तर एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शर्लिनला विचारण्यात आले की तू राहूल गांधी यांच्याशी लग्न करू इच्छितेस का ? त्यावर उत्तर देताना शर्लिन म्हणाली, हो, हो का नाही ! पण माझी एक अट आहे. लग्नानंतरही मी माझं आडनाव चोप्रा लावू इच्छिते. असं उत्तर तिने दिलं, तिचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाल आहे.
शर्लिनचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक यूजर्स त्यावर सतत कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘राखी सावंतची हवा हिलाही लागली वाटतं’. तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, ‘हिच्याशी लग्न करून राहूल गांधींना त्यांचं आयुष्य वाया घालवायच नाहीये’. अनेकांनी शर्लिनला ट्रोल केले आहे. ‘तू (लग्न) नक्की करशील पण ते ( राहूल गांधी) कधीच करणार नाहीत’ अशी कमेंटही एका युजरने केली आहे.
शर्लिन चोप्रा यापूर्वी अनेकदा वादात सापडली आहे. तिच्या वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. बिग बॉसच्या घरातून दिग्दर्शक साजिद खानला बाहेर काढण्यासाठी तिने प्रयत्न केले होते, तेव्हा ती पुन्हा चर्चेत आली होती. मात्र ती त्यामध्ये अपयशी ठरली. साजिदला बाहेर काढण्यासाठी ती पोलिसांपर्यंतही गेली होती. तिने साजिदविरोधात तक्रारही दाखल केली होती.