TMKOC | कोर्टात असित मोदी यांना मानावी लागली हार… शैलेश लोढा यांना द्यावे लागले इतके कोटी!

| Updated on: Aug 05, 2023 | 3:11 PM

'सत्याचा विजय झाला!' कोर्टात शैलेश लोढा यांचा विजय; कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर असित मोदी उचललं मोठं पाऊल... 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका चर्चेत...

TMKOC | कोर्टात असित मोदी यांना मानावी लागली हार... शैलेश लोढा यांना द्यावे लागले इतके कोटी!
Follow us on

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अनेक चढ उतार सुरु आहेत. ज्यामुळे मालिका तुफान चर्चेत आली. मालिकेतील अनेक कलाकारांनी निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही तर, तब्बल १४ वर्ष मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी देखील मानधन दिलं नसल्यामुळे असित मोदी यांच्यावर आरोप करत मालिकेचा निरोप घेतला. एवढंच नाही तर, न्याय मिळवण्यासाठी शैलेश लोढा यांनी कायद्याची मदत घेतली..

थकबाकी न दिल्यामुळे शैलेश लोढा यांनी निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल केला होतो. रिपोर्टनुसार, कोर्टात शैलेश लोढा यांचा विजय झाला आहे. कोर्टाने शैलेश लोढा यांच्या बाजून निकाल सुनावला आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात निकाल आला होता, त्यानंतर ‘सेटलमेंट अटींनुसार १,०५,८४,०००/- ची रक्कम असित मोदी यांनी शैलेश लोढा यांना डिमांड ड्राफ्टद्वारे दिल्याची माहिती समोर येत आहे.

शैलेश यांनी एप्रिल २०२२ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा निरोप घेतला होता. वेळेत मानधन मिळत नसल्यामुळे शैलेश लोढा यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) कडे संपर्क साधला आणि या लढाईमध्ये शैलेश यांचा विजय झाला. सध्या सर्वत्र शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

कोर्टाने निकाल सुनावल्यानंतर ‘सत्याचा विजय झाला!’ असं शैलेश लोढा म्हणाले. शिवाय त्यांनी एनसीएलटीचे आभार देखील मानले.. ‘ही लढाई पैशांसाठी नव्हती. न्याय आणि स्वाभिमानाबद्दल ही लढाई होती आणि मी एक लढाई जिंकली आहे. निकालानंतर मला आनंद आहे… असं देखील शैलेश लोढा म्हणाले.

यावेळी शैलेश लोढा यांनी मालिकेतील एका अभिनेत्रीबद्दल देखील सांगितलं आहे. अभिनेत्रीचं नाव न घेता शैलेश लोढा म्हणाले, ‘तीन वर्ष अभिनेत्रीला मानधन दिलं नव्हतं. मी खटला दाखल केल्यानंतर अभिनेत्रीला प्रॉडक्शन हाऊसने बोलावले आणि तिची थकबाकी देण्यात आली. अभिनेत्रीने आभार मानन्यासाठी मला फोन देखील केला होता.. असं देखील शैलेश लोढा म्हणाले.