मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत, जे स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत. म्हणून आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचं नाव काय असेल याबद्दल चाहत्यांना माहिती नसतं. अभिनेत्री रेखा, काजोल, तब्बू यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर, बॉलिवूडमधील काही अभिनेते देखील स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत. सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या आडनावाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी स्वतःचं पूर्ण नाव बदललं आहे. पण सेलिब्रिटींच्य आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांच्या समोर येतच असतात. तर आज जाणून घेवू प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या आडनावाबद्दल…
अभिनेत्री काजोल – काजोल हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत काजोल हिच्या जोडीला तर चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण काजोलने कधीच स्वतःच्या नावापुढे आडनाव लावलं नाही. काजोल हिने पूर्ण नाव काजोल मुखर्जी असं आहे. कजोल प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचं नाव शोमू मुखर्जी असं होतं..
अभिनेत्री रेखा – रेखा यांना मोठ्या पडद्यावर यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र रेखा यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. रेखा यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन असं होतं. पण त्यांनी कधीच स्वतःच्या नावापुढे आडनाव लावलं नाही. आज त्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत.
अभिनेता गोविंदा – गोविंदा यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गोविंदा आज बॉलिवूडपासून दूर असले तरी, चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये गोविंदा यांचं नाव फार मोठं आहे. पण त्यांनी कधीच स्वतःच्या नावापुढे आडनाव लावलं नाही. गोविंदा यांचं खरं नाव अरुण आहुजा आहे.
अभिनेत्री तब्बू – हिने देखील ९० च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकरात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील अभिनेत्री ‘दृश्यम’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आली होती. चाहत्यांमध्ये अभिनेत्री लोकप्रिय आहे. पण अभिनेत्रीच्या चाहत्यांना तब्बू हिचं आडनाव माहिती नाही. अभिनेत्रीचं पूर्ण नाव तब्बुसुम हाश्मी आहे.
काजोल, रेखा, गोविंदा, तब्बू यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. आज ९० च्या दशकातील सेलिब्रिटी रुपेरी पडद्यापासून दूर असतात, पण त्यांची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही. आजही सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.