मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू यांच्यामध्ये असलेल्या नात्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून रंगत आहे. झगमगत्या विश्वात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींवर प्रेम केलं आणि त्यानंतर लग्न… पण काही कपल असे देखील आहेत, ज्याची ‘लव्हस्टोरी’ पूर्ण होवू शकली नाही. पण त्यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते…
अभिनेत्री माधुरी दीक्षित – माधुरी हिचं नाव माजी क्रिकेटर अजय जडेजा यांच्यासोबत जोडण्यात आलं. माधुरी आणि अजय यांची ओळख फिल्मफेअर फोटोशूट दरम्यान झाली. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. सर्वकाही उत्तम सुरु असताना त्यांच्या नात्यात वाद होवू लागल्याची माहिती समोर आली. अजय जडेजा यांच्या क्रिकेट कामगिरीत मोठे नकारात्मक बदल झाले. शिवाय त्यांचं नातं तुटण्यामागे कुटुंबिय असल्याचं रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं.
अभिनेत्री नीना गुप्ता – नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात. विवियन यांच्या प्रेमात नीना गुप्ता यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तेव्हा विवियन विवाहित होते. अशात नीना गरोदर राहिल्या. त्यांनी एका मुलीला जन्म दिला. विवियन यांनी साथ सोडल्यानंतर नीना यांनी सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला.
अभिनेत्री तमन्ना भाटिया – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. 2012 मध्ये तमन्ना आणि विराट कोहली हे एका जाहिरातीसाठी एकत्र आले. जाहिरातीत एकत्र काम केल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र दोघांनी त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर 2017 मध्ये विराटने अनुष्का शर्माशी लग्न केलं.
अभिनेत्री नताशा स्टेनकोविक – हार्दिकने जानेवारी 2020 मध्ये अभिनेत्री नताशा स्टेनकोविचसोबत साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर काही महिन्यानंतर 31 मे 2020 रोजी लग्नबंधनात अडकले. हार्दिक आणि नताशाची पहिली ओळख एका नाईट क्लबमध्ये झाली होती. हार्दिक पांड्याने एका मुलाखतीत याबाबतच खुलासा केला आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण – अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत लग्न करण्याआधी दीपिका हिचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. क्रिकेटर युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. एक काळ असा होता की, युवराज आणि दीपिका पादुकोणच्या नात्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. रणवीरशी लग्न करण्यापूर्वी दीपिकाने महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह या दोन्ही क्रिकेटपटूंना डेट केल्याच्या चर्चा रंगल्या.