Don 3 : शाहरूख नाही तर डॉन 3 नाही.. फरहान अख्तरवर भडकले चाहते !

| Updated on: Aug 08, 2023 | 1:59 PM

फरहान अख्तरने 'डॉन 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात शाहरूख खानऐवजी अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Don 3 : शाहरूख नाही तर डॉन 3 नाही.. फरहान अख्तरवर भडकले चाहते !
शाहरूख नाही, तर डॉन 3 नाही..
Follow us on

Don 3 Announcement : शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या डॉन 2 (Don 2) नंतर चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टची खूप दिवसांपासून वाट पहात होते. फरहान अख्तर कोणतीही घोषणा करणार असेल की लोकांना वाटायचं तो डॉन 3 ची घोषणा करणार आहे. मात्र चाहत्यांची वाट पाहण्याची वेळ अखेर संपली आहे. फरहानने आता ‘डॉन 3’ ची अनाउन्समेंट केली आहे. ‘डॉन 3’ सह नवं युग घेऊन येत आहे, असेही फरहानने म्हटले आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात शाहरूख खानऐवजी अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यामुळे चाहते खूपच भडकले आहेत.

फरहान अख्तरने सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने ‘डॉन 3’ बद्दल सांगितले आहे. मात्र असे असले तरी फरहाने या चित्रपटाच्या स्टारकास्ट बद्दल काहीही सांगितले नाही. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर रणवीर सिंगने शाहरूख खानला या चित्रपटात रिप्लेस केले आहे. पण फॅन्स मात्र रणवीरला स्वीकारण्यास तयार नाहीत.

 

संतप्त युजर्सनी केल्या कमेंट्स

फरहानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘डॉन 3’ ची घोषणा करताच हजारो लोकांनी ती पोस्ट लाइक केली. यावर अनेक कमेंट्सही येत असून शाहरूखविना ‘डॉन 3’ बनू शकत नाही, असाच सूर त्यामध्ये ऐकायला मिळत आहे. ‘लाज वाटायला पाहिजे. SRK सोबत (चित्रपट) का केला नाही ?’ असा संतप्त सवाल एका चाहत्याने केला आहे. तर ‘ No SRK, No Don ‘ अशी कमेंटही एकाने केली आहे. ‘ शाहरुखशिवाय इतर कोणालाही (चित्रपटातील) तो स्वॅग कॅरी करता येणार नाही’ असेही एका चाहत्याने लिहीले आहे. तर ‘ शाहरुख शिवाय ‘डॉन 3′ ची कल्पनाही करू शकत नाही’ असेही एका युजरने लिहीले आहे. एकंदरच चाहत्यांना ‘डॉन 3’ मध्ये शाहरूख शिवाय इतर कोणालाही बघायला आवडणार नाही, असेच या कमेंट्सवरून स्पष्ट होत आहे.

 

रणवीरच्या नावाची लवकरच होणार घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, ‘डॉन 3’मध्ये रणवीर सिंहच्या नावाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. गदर 2 आणि ओएमजी 2 सोबत चित्रपटाचा टीजर रिलीज करण्याचा प्लान आखत आहेत. येत्या आठवड्यातच हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

संजय लीला भन्साळी यांच्या बैजू बावराचे शूटिंग संपल्यानंतर डॉन 3 साठी शूटिंग सुरू करणार असल्याचे समजते. या चित्रपटासाह फरहान अख्तर पुन्हा दिग्दर्शन करणार असून 2025 साली हा चित्रपट रिलीज होईल असे समजते.