Kartik Aaryan | मला लोकांना हसवण्यापेक्षा रडवायला… कार्तिक आर्यनच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय ?

| Updated on: Aug 07, 2023 | 1:05 PM

सत्यप्रेम की कथा या चित्रपटाबाबत बोलताना कार्तिक आयर्न म्हणाला की, मला लोकांना हसवण्यापेक्षा रडवायला जास्त मजा येते. त्याच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

Kartik Aaryan | मला लोकांना हसवण्यापेक्षा रडवायला... कार्तिक आर्यनच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय ?
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेता कार्कित आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचं यश एन्जॉय करत आहे. त्याशिवाय तो ‘चंदू चँपियन’ (Chandu Champion) या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्येही खूप व्यस्त आहे. चित्रपटाच्या अभिनेत्याच्या लूकचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे चाहत्यांनाही खूप आवडले आहेत.

नुकतंच कार्तिकने एका मुलाखतीत या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. एवढचं नव्हे तर मला लोकांना हसवण्यापेक्षा रडवायला जास्त मजा येते, असंही तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होत आहे.

‘चंदू चँपियन’ साठी कार्तिक आर्यनने वाढवले वजन

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने ‘चंदू चँपियन’ मधील त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले. या चित्रपटात माझ्या वजनात तुम्हाला बराच फरक दिसून येईल. यासाठी मी 2 महिन्यांत माझं वजन वाढवलं. एवढंच नव्हे तर लंडनमध्ये खूप ताप असतानाही थंड पाण्यात शूटिंग केले होते. शूटिंगपूर्वी बरीच औषधे घेतल्याचेही कार्तिकने नमूद केले.

हसवण्यापेक्षा मला रडवायला जास्त आवडतं – कार्तिक आर्यन

याच मुलाखतीत तो ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाबद्दलही बोलला. मला कोणत्याही चित्रपटात लोकांना हसवण्यापेक्षा त्यांना रडवायला जास्त आवडतं, असं कार्तिक म्हणाला. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ चित्रपट पाहिलात तर त्यामध्येही पहिले 30-40 शुद्ध नाटक आहे. ज्यात मित्रांमध्ये प्युअर भावना आहेत. मैत्रीसाठी तुमच्या डोळ्यांत पाणी येतं. पण ती मुख्यत: कॉमेडी फिल्म आहे, त्यामुळे तुम्ही त्यातील कॉमेडीकडेच लक्ष देता. चित्रपटातील भावना किंवा ड्रामा याकडे तुमचं इतकं लक्ष जाणार नाही. ‘लुका छुपी’मध्येही असं झालं, तिथे इमोशनल सीन्सवर कॉमेडी सीन्स हावी होतात, पण ‘सत्य प्रेम की कथा’ मध्ये असं झालं नाही, असं कार्तिकने सांगितलं

‘चंदू चँपियन’ व्यतिरिक्त कार्तिकच्या हातात’आशिकी 3′ आणि भूल भुलय्या 3′ यासह अनेक रंजक चित्रपट आहेत. त्यापैकी काहींची घोषणा होणे बाकी आहे.