मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल पैकी एक आहे. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी फार कमी पाहुण्यांच्या उपस्थित २००७ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आजही सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगत असते. देशातील प्रत्येकाची नजर फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाकडे होती. एकीकडे चाहते आणि सेलिब्रिटी दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देत होते, तर दुसरीकडे एका अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता.
अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांच्या लग्नाच्या दिवशी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनेत्याला स्वतःचा पती सांगत आत्महत्येचा प्रयत्न केला होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री जान्हवी कपूर होती. अभिषेक बच्चन आणि जान्हवी कपूर यांनी ‘दस’ सिनेमात स्क्रिन शेअर करणार होती.
अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांचं लग्न २००७ मध्ये राहत्या घरी झालं होतं. लग्नासाठी पाहुण्याची वर्दळ होती. तेव्हाच जान्हवी कपूर देखील लग्नाच्या ठिकाणी पोहोचली. जान्हवीने लग्नमंडपात जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनी तिला जाऊ दिलं नाही. एवढंच नाही तर, बच्चन कुटुंबाच्या घरासमोर जान्हवीने गोंधळ सुरू केला.
अभिषेक बच्चन याला स्वतःचा पती सांगत जान्हवी हिने ऐश्वर्याने माझा पती चोरला… असे आरोप केले होते. माझी फसवणूक करुन अभिषेक लग्न करतोय… असं म्हणत जान्हवीने वादग्रस्त वातावरण तयार केलं होतं. अखेर तिने जुहू पोलीस ठाणे गाठून अभिषेकविरोधात गुन्हा नोंदवून लग्न थांबवण्याचे आवाहन केले. पण पोलिसांनी देखील जान्हवीची तक्रार नोंदवून घेतली नाही.
पोलिसांनी तक्रार ऐकून न घेतल्याने ती पुन्हा बच्चन कुटुंबीयांच्या घराबाहेर आली आणि अभिनेत्रीने स्वतःवा संपवण्याचा प्रयत्न केला. हातातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून जान्हवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा अभिषेक याचं लग्न होईपर्यंत जान्हवी हिला रुग्णालयात ठेवण्यात आलं.
या धक्कादायक घटनेनंतर जान्हवी कोणत्याच सिनेमात दिसली नाही. एवढंच नाही तर, जान्हवी कधी माध्यमांसमोर देखील आली नाही. आता जान्हवी कपूर कुठे आहे, काय करते? कोणालाच माहिती नाही. तेव्हा जान्हवीचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.