बंगळुरु : काँग्रेसने कर्नाटकात सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने १३६ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने कर्नाटकात १९८९ नंतर पहिल्यांदा इतक्या जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १९८९ मध्ये १७८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ५६ जागांचा फायदा झाला आहे. तर भाजपचं ४० जागांचं नुकसान झालं आहे. जेडीएसला १८ जागा गमवाव्या लागल्या आहेत.
कर्नाटक निवडणुकीत यंदा ३ कोटी ८४ लाख लोकांनी मतदान केले होते. ज्यापैकी ४३ टक्के मते काँग्रेसला गेली. महत्त्वाचं म्हणजे भाजपला मागच्या निवडणुकी इतकेच मतदान झाले. पण जेडीएसची ५ टक्के मतदान कमी झाले. ज्याचा फायदा काँग्रेसला झाला. जेडीएसला २०२८ च्या निवडणुकीत १८ टक्के मतदान झाले होते. पण यंदा १३ टक्के मतदान झाले.
२०१८ च्या निवडणुकीत भाजपला १ कोटी ३२ लाख मतदान झाले होते. यंदा भाजपला १ कोटी ४० लाख मतदान झाले. जेडीएसला ५३ लाख मतदान झाले होते. २०१८ मध्ये त्यांना ६७ लाख मतदान झाले होते. काँग्रेसला २०२८ मध्ये १ कोटी ३९ लाख मतदान झाले होते. २०२३ मध्ये जेडीएसला १ कोटी ६८ लाख मतदान झाले.
महाराष्ट्र कर्नाटकात भाजपला ३५ जागांचा फटका बसला. येथे जेडीएसचे मतदान कमी झाल्याने काँग्रेसला फायदा झाला. काँग्रेसने मुस्लीम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही मोठी आश्वासने दिली होती. मुस्लीम आरक्षण पुन्हा लागू करण्याचं काँग्रेसने दिले होते. ज्याचा त्यांना फायदा झाला. १३ टक्के मुस्लीम मतदारांनी काँग्रेसला मतदान केले. सत्तेत आले तर बजरंग दलवर बंदी घालण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती.
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आता बजरंग दलवर बंदी घातली जावू शकते. तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी मिळू शकते. मुस्लीम आरक्षण पुन्हा एकदा लागू केलं जावू शकतं.