10 वी नंतर जॉइन करा हे Short Term Course, मिळेल चांगली नोकरी, 4 ते 5 लाखांपर्यंत पॅकेज!

| Updated on: May 14, 2023 | 6:06 PM

आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यांची फी ही खूप कमी आहे, जे तुम्ही सहज भरू शकता आणि तुमच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळवू शकता.

10 वी नंतर जॉइन करा हे Short Term Course, मिळेल चांगली नोकरी, 4 ते 5 लाखांपर्यंत पॅकेज!
Short term courses
Follow us on

मुंबई: आजच्या काळात तरुणांसाठी करिअरचे अनेक पर्याय खुले झाले आहेत. आज तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार कोणताही शॉर्ट टर्म कोर्स करून 10 ते 25 हजार रुपयांची नोकरी सहज मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यांची फी ही खूप कमी आहे, जे तुम्ही सहज भरू शकता आणि तुमच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळवू शकता.

1. डिप्लोमा इन स्टेनोग्राफी

आजच्या काळातील सर्वात ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सबद्दल बोलायचे झाले तर तो म्हणजे डिप्लोमा इन स्टेनोग्राफी. खरं तर याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला स्टेनोग्राफीसोबतच कॉम्प्युटर आणि टायपिंग शिकवलं जातं. स्टेनोग्राफी शिकून तुम्ही सरकारी नोकरी सहज मिळवू शकता. याशिवाय स्टेनोग्राफी शिकून तुम्ही कोणत्याही मल्टिनॅशनल कंपनीत (एमएनसी) दरमहा सुरुवातीचे 25 ते 30 हजार रुपये सहज कमावू शकता.

2. डिप्लोमा इन फाइन आर्ट्स

हे असे युग आहे जेव्हा कला आणि कलाकार या दोघांनाही जगभरात महत्व दिले जाते. जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्टची थोडीफार समज किंवा आवड असेल तर फाइन आर्ट्स क्षेत्रात डिप्लोमा करून तुम्ही उत्तम करिअरच्या दिशेने वाटचाल करू शकता. दहावीच्या आधारे 6 महिने ते एक वर्षांपर्यंत डिप्लोमा केला जातो. हा कोर्स केल्यानंतर ग्राफिक डिझायनर, आर्ट टीचर, फ्लॅश ॲनिमेटर, आर्ट लायसन्स ऑफिसर या पदांवर नोकरी मिळू शकते आणि दरमहा 50 हजारांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.

3. डिप्लोमा इन मल्टिमीडिया

तिसऱ्या शॉर्ट टर्म कोर्सबद्दल बोलायचं झालं तर आजच्या काळात प्रत्येक तिसरी व्यक्ती सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून फेमस होत आहे. यासोबतच तो भरपूर पैसाही कमवत आहे. या व्हिडिओ निर्मात्यांना त्यांचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी व्हिडिओ एडिटर, ॲनिमेटर आणि ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते. अशा तऱ्हेने दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या क्षेत्रात करिअर करू शकतात. त्यासाठी डिप्लोमा इन मल्टिमीडियाचा शॉर्ट टर्म कोर्स करून व्हिडिओ एडिटर,ॲनिमेटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून करिअर सुरू करू शकता.

4. डिप्लोमा इन आर्ट टीचर

भविष्यात शिक्षक व्हायचे असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. मात्र कलाशिक्षक होण्यासाठी तुम्हाला कला आणि हस्तकलेची आवड असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन आर्ट टीचरचा 4 महिन्यांचा शॉर्ट टर्म कोर्स करावा लागेल, त्यानंतर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकाल. वास्तविक या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे हे शिकवले जाते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम चांगला पर्याय आहे. खासगी संस्थांमध्येही या अभ्यासक्रमाची मागणी जास्त आहे. हा कोर्स करून तुम्ही महिन्याला ३० ते ३५ हजार रुपये सहज कमावू शकता.