नवी दिल्ली: सीयूईटी रिझल्टची आतुरतेने वाट बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. CUET UG 2023 चा निकाल 17 जुलै 2023 पर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. निकाल cuet.samarth.ac.in अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांच्या अर्ज क्रमांकाद्वारे निकाल पाहू शकतात. NTA ने CUET UG 2023 ची फायनल आन्सर कि जारी केली आहे. विविध केंद्रीय, राज्य आणि खासगी विद्यापीठांमध्ये यूजी अभ्यासक्रमांना प्रवेश सीयूईटी यूजी स्कोअरच्या माध्यमातूनच मिळणार आहे. सुमारे 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अधिक माहितीसाठी विद्यार्थी एनटीएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
CUET-UG results to be announced by July 17: UGC Chairman Jagadesh Kumar
— Press Trust of India (@PTI_News) July 13, 2023
ही परीक्षा 21 मे पासून सुरू झाली होती. CBT पद्धतीने ही परीक्षा अनेक टप्प्यांत घेण्यात आली होती. यंदा 200 हून अधिक विद्यापीठांनी यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटी यूजी परीक्षेचा अवलंब केला आहे.
निकाल जाहीर होताच DU, BHU सह अनेक विद्यापीठांमधील यूजी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. सीयूईटी स्कोअरच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीए लवकरच सीयूईटी पीजी 2023 ची तात्पुरती उत्तर-की देखील जारी करू शकते. यानंतर त्यावर हरकती नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देण्यात येणार आहे.