छत्रपती संभाजीनगर : संताप किंवा राग आला तर व्यक्ती काय करेल याचा काहीही नेम नसतो. त्याचं कारण म्हणजे तो संताप किंवा राग व्यक्त करण्यासाठी तो कसलाही विचार करत नाही. नुकसानीचाही नाही आणि जीवाचाही नाही. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडला आहे. एका दुकानदाराने खरंतर दुकान उभं करण्यासाठी शेती विकली होती. त्यातून आलेल्या पैशातून त्याने स्पेअर पार्टचे दुकान सुरू केले होते. मात्र, सिडकोच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून याच दुकानदाराला विचारणा केली जात होती. त्यामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. त्याच अतिक्रमण हटाव पथकाला वैतागून तरुणाने दुकानातील साहित्य पेटवून संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाज नगर परिसरातील ही घटना आहे. माणिक ज्ञानोबा शिंदे असं वैतागून साहित्य पेटवणाऱ्या दुकानदाराने नाव आहे. ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानातील साहित्याला त्यांनी आग लावून संताप व्यक्त केला आहे.
अनेक वेळा विनवण्या करूनही अतिक्रमण पथक ऐकत नसल्यामुळे माणिक ज्ञानोबा शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलले. आपल्या दुकानातील सर्व साहित्य बाहेर काढून पेटवून देत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
खरंतर शेती विकून माणिक ज्ञानोबा शिंदे यांनी दुकान उभारले होते. ऑटो स्पेअर पार्टचे दुकान शिंदे यांचे होते. त्याच ठिकाणी वारंवार अतिक्रमणचे अधिकारी वारंवार त्रास देत होते. त्यावरून शिंदे यांनी थेट दुकानातील साहित्यालाच आग लावली आहे.
यानंतर मात्र, सिडकोच्या अतिक्रमण हटाव पथकासह आजूबाजूच्या दुकानदारांची चांगलीच पळापळ झाली होती. शिंदे यांनी व्यक्त केलेल्या संतापाची सर्वत्र चर्चा हो लागली असून हे पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.