महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) अंतर्गत 223 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 24 मे 2022 अर्ज करायची शेवटची तारीख (Last Date) आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य) या जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (Online Examination) केली जाणार आहे. ही परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात होऊ शकते. अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
सहायक अभियंता (Assistant Engineer Transmission)- Bachelors Degree In Electrical Engineering/ Technology
सहायक अभियंता (Assitant Engineer Telecommunication)- Bachelors degree in Engineering stream of B.E.(Electronics & Telecommunication) OR B.Tech (Electronics And Telecommunication)
सहायक अभियंता (Assitant Engineer Civil) : Bachelors Degree In Civil Engineeering/ Technology
खुल्या प्रवर्गासाठी – 700/- रुपये
राखीव प्रवर्गासाठी – 350/- रुपये
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
रिक्त पदे – 223 पदे
नोकरीचं ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करायची शेवटची तारीख – 24 मे 2022
निवड पद्धती : ऑनलाईन परीक्षा
परीक्षेची संभाव्य तारीख – जून / जुलै 2022
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.