Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीचे भाववाढीचे बंधन! भाऊरायांची बाजारात वर्दळ

| Updated on: Sep 13, 2023 | 12:56 PM

old Silver Rate Today : सणासुदीत सोने-चांदीची काय चाल असेल, किती किंमती वधारतील, अशी चर्चा सुरु आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीत किंचिंत उसळी पहायला मिळाली. भारतीय बाजारात पण सोने किंचित वधारले तर चांदीत मामूली घसरणी दिसून आली. त्यामुळे भाऊरायाला लाडक्या बहिणीला एखादे मौल्यवान गिफ्ट देता येऊ शकते.

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीचे भाववाढीचे बंधन! भाऊरायांची बाजारात वर्दळ
Image Credit source: गुगल
Follow us on

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात सोन्यात किंचित वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्यासह चांदीत मोठी घसरण झाली. गेल्या आठवड्यात दरवाढीने ही घसरण भरुन निघाली. तरीही उच्चांकाकडे अजूनही दोन्ही धातूंना मोठी मजल मारता आलेली नाही. गेल्या आठवड्यात सोने-चांदीने दबाव झुगारत आगेकूच केली होती. पण अजूनही अपेक्षित उच्चांक दोन्ही धातूंना गाठता आलेला नाही. दोन्ही धातूंमध्ये चढउतार सुरु आहे. जुलै महिन्यात सोन्याने मोठी उसळी घेतली होती. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने (Gold-Silver Price Today 29 August 2023) विक्रम केला होता. तितका पल्ला अजून गाठता आलेला नाही. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम दोन्ही धातूंवर दिसून आला. सणासुदीत आता भाव वधारतील की कमी होतील, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

गेल्या आठवड्यात किंमतीत वाढ

गुडरिटर्न्सनुसार, सोन्यात 1, 5 ऑगस्ट रोजी सोन्यात 100-150 रुपयांची वाढ झाली. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 25 ऑगस्ट रोजी दरवाढीला ब्रेक लागला. शनिवारी, रविवार असल्याने किंमती अपडेट झाल्या नाहीत. तर 28 ऑगस्ट रोजी सोन्यात 50 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. 22 कॅरेट सोने 54,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,550 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

हे सुद्धा वाचा

चांदी 4000 रुपयांनी वधारली

16 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. 18 ऑगस्टला 1000 रुपयांची चढाई केली. 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली. 23 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 500 रुपयांनी वधारल्या. 24 ऑगस्ट रोजी चांदीने 1600 रुपयांची मोठी झेप घेतली. 26 ऑगस्ट रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,667 रुपये, 23 कॅरेट 58,432 रुपये, 22 कॅरेट सोने 53,739 रुपये, 18 कॅरेट 44000 रुपये, 14 कॅरेट सोने 34,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 73,636रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.