EPFO PF Merge | खासगी क्षेत्रात (Private Sector)नोकरी बदल झाला तर फायदा जास्त होतो हे गणित पक्कं आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात सातत्याने नोकरीत बदल करण्यात येतो. प्रत्येक नवीन कंपनीत रुजू होण्याच्या वेळी (Joining) जून्या UAN क्रमांकावरूनच पीएफ खाते (PF Account) सुरु होते. वास्तविक, नवीन पीएफ खात्यात जून्या कंपनीचा फंड जमा होत नाही. त्यासाठी पीएफ खातेधारकाला ईपीएफओ (EPFO) च्या संकेतस्थळावर जाऊन खात्याला विलीन (EPF Account Merge) करुन घ्यावे लागेल. पीएफ विषयी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन सुविधेसाठी UAN म्हणजेच (Universal Account No) माहिती असणे आवश्यक आहे. सोबतच UAN खाते सक्रिय असणे आवश्यक आहे. EPFO ची दोन खाते एकत्र करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला ईपीएफओच्या संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पीएफ खात्यात एकत्रित रक्कम दिसेल.
EPFO खाते विलीन करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर ईपीएफओच्या संकेतस्थळावर जावे लागेल. याठिकाणी तुम्हाला सेवा (Services) या पर्यायात जाऊन One Employee-One EPF Account वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर EPF खाते विलीन करण्यासाठीचा अर्ज उघडेल. त्याठिकाणी पीएफ खातेधारकाला त्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर UAN आणि सध्याचा कर्मचारी आयडी (Employee ID) टाकावा लागेल.
सर्व महत्वपूर्ण माहिती भरल्यानंतर Authentication करण्यासाठी OTP जनरेट होईल. या ओटीपी क्रमांक तुमच्या नोंदणीकृत (Register) मोबाईलवर येईल. त्याठिकाणी तुमचा जूना पीएफ खाते क्रमांक दिसेल. त्यानंतर पीएफ खाते क्रमांक टाका आणि डिक्लेरेशन स्वीकार करा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. तुमचे खाते विलीन करण्याची विनंती मान्य होईल. पडताळ्यानंतर (Verification) तुमचे पीएफ खाते विलीन होईल.
तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे माहिती करुन घेणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन एक कॉल किंवा मेसेज करावा लागेल. आपल्या नोंदणीकृत मोबईल नंबरवरुन “EPFOHO UAN” टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवा. ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
तुम्हाला तुमच्या मातृभाषेत माहिती हवी असेल तर त्यासाठी नोंदणीकृत मोबाईलनंबरवरुन EPFOHO UAN टाईप करुन आपल्या भाषेतील पहिले तीन अक्षरं टाईप करा. उदाहरणार्थ मराठीत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN MAR टाईप करुन 7738299899 नंबरवर पाठवा.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन मिसकॉल देऊनही पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करता येतो. आपल्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर कॉल करा. दोन रिंग वाजल्या की तुमचा फोन आपोआप कट होईल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.