नवी दिल्ली : आता मधुमेहाचे रुग्णही आंब्याचा आस्वाद घेऊ शकतात. बाजारात शुगर फ्री आंबे आले आहेत. हे आंबे खाल्याने मधुमेहींच्या प्रकृतीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. ते आधीसारखे आंबे खाल्यानंतरही निरोगी राहू शकतात. शुगर फ्री आंब्याची शेती देशातील काही शेतकरी करतात. पण, मुजफ्फरपूरमध्ये तयार करण्यात आलेले आंबे वेगळेच आहेत. येथील एका शेतकऱ्याने शुगर फ्री आंब्याची जात विकसित केली आहे. हे आंबे मधुमेही रुग्णही खाऊ शकतात.
शुगर फ्री आंब्याची शेती करणारे शेतकरी राम किशोर सिंह आहेत. मुजफ्फरपूर मुखहरी प्रखंडातील बिंदा गावातील रहिवासी आहेत. गेल्या कित्तेक वर्षांपासून ते आंब्यावर काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी आंब्याच्या वेगवेगळ्या व्हेरायटी विकसित केल्या आहेत. यात शुगर फ्री आंबेही आहेत.
राम किशोर सिंह यांचं म्हणण आहे की, त्यांनी शुगर फ्री आंब्याची नवी जाती विकसित केली. त्याची चर्चा देशभर होत आहे. ते म्हणतात की, त्यांनी तयार केलेला मालदा आंबा शुगर फ्री आहे. मालदा आंबे मधुमेहाचे रुग्णही खाऊ शकतात. मधुमेही रुग्णांवर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
मालदा आंब्याचा टीएसएस म्हणजे टोटल सॉल्युबल सब्सटन्स २५ पर्यंत राहतो. परंतु, त्यांच्या बागेतील मालदा आंब्याचा टीएसएस १२ ते १३ राहतो. त्यामुळे मधुमेहाची रुग्ण मालदा आंबे खाऊ शकतात. शुगरचा आजार असणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या बागेतील आंबे कोणतेही नुकसान करत नाही.
विशेष म्हणजे राम किशोर सिंह यांनी आपल्या या आंब्याच्या व्हेरायटीची टेस्ट केली. ज्या शेतकऱ्यांना शुगर फ्री आंबे लागवड करायची असेल त्यांच्यासाठी रोपे येथून मिळू शकतील. एका शुगर फ्री आंब्याच्या रोपाची किंमत चार हजार रुपये आहे.
राम किशोर सिंह फळबाग लागवटीत पितामह भिष्म आहेत. शेती आणि फळबागेत त्यांची रुची असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जळगावच्या एएसएम फाउंडेशनने त्यांना उद्यान रत्न पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय कृषीतील कित्तेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे शुगर फ्री आंब्याची प्रजाती विकसित केल्यामुळे देशात ते प्रसिद्ध झाले आहेत.