कमी दरात धान केंद्रांवर खराब धान खरेदी?, राईस मीलर्सच्या पथ्यावर निकृष्ट धान

काही धान केंद्रातील संचालक हे खराब धान कमी दरात खरेदी करतात. नवीन धान्य म्हणून राईस मील चालकांना धानाचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

कमी दरात धान केंद्रांवर खराब धान खरेदी?, राईस मीलर्सच्या पथ्यावर निकृष्ट धान
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 4:21 PM

शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : धान्याचा कोठार अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. प्रत्येक वर्षी धान घोटाळा झाल्याचे समोर येते. यामुळे धान घोटाळा आणि गोंदियाचे समीकरण हे काही आपल्यासाठी नवीन राहिलेला नाही. गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे या ठिकाणी उत्पादन घेतले जाते. उत्पादित केलेला धान हा आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केला जातो. खरेदी केलेले धान्य राईस मील चालकांमार्फत मिलिंग करून तांदळाचा पुरवठा करण्यात येतो.

राईस मीलद्वारे खराब तांदळाचा पुरवठा झाल्याच्या अनेक तक्रारी असतात. पण यावेळी मात्र राईस मील चालकांनी कशाप्रकारे तांदूळ तयार करावा. तेही शासकीय नियमांना धरून. अशा पेचात आता राईस मीलचालक पडलेले आहेत.

काही ठिकाणी जळलेला धान

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक धान खरेदी केंद्रावर धान नाही. त्यामुळे धान केंद्रातील संचालक हे खराब धान कमी दरात खरेदी करतात. नवीन धान्य म्हणून राईस मील चालकांना धानाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. धानाची प्रत्यक्षात पाहणी केली असता अनेक ठिकाणी खराब झालेला धान, जळलेला धान दिसला.

पोत्यातील धान्याला आले कोंब

एवढेच नाही तर अनेक पोत्यांना धानाचे कोंब आले असल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे खराब धान खरेदी करणारे राईस मीलचालक संकटात सापडले आहेत. एवढंच नाही तर धान खरेदी संचालकही कोणाची ऐकत नाहीत. त्यामुळे राईस मील चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

धान खरेदी केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार?

प्रशासन याकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारचे धान राईस मील चालकांना मिळावे. तसेच धान केंद्रावर नियंत्रण कशाप्रकारे ठेवता येईल. याबाबत धोरण आखण्याची गरज राईस मील चालक रवी अग्रवाल यांनी व्यक्त केली.

राईस मील चालकांना खराब झालेला धान पुरवण्यात आला. राईस मील चालकांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे राईस मील चालक संकटात सापडले आहेत. धान खरेदी केंद्र चालकांवर नियंत्रण ठेवणार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.