September | सप्टेंबर (September) महिन्यात शेअर बाजाराने (Share Market) गुंतवणूकदारांची चांदी केली. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात तेजी आल्याने गुंतवणूकदारांनी (Investor) कोट्यवधी रुपयांची कमाई केली. BSE सुचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील भांडवल जवळपास 2 लाख कोटी रुपयांनी वाढले. त्यामुळे सणासुदीच्या काळात हा एक चांगला संकेत समजल्या जात आहे.
शेअर बाजारातून या महिन्यात, सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातच दणक्यात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी सुरु आहे. त्याचा फायदा भारतीय शेअर बाजाराला मिळत आहे. बुधवारी Dow Jones मध्ये 435.98 अंकांची तेजी आली. S&P 500 इंडेक्स मध्ये 1.83 टक्के तेजी होती. तर Nasdaq 2.14 टक्के आघाडीवर होता.
आशियातील बाजारात SGX Nifty 0.65 टक्क्यांसह आघाडीवर होता. निक्कईत 2 टक्क्यांची वाढ झाली. तर स्ट्रेट टाईम्स 0.86 टक्क्यांची वाढ झाली. ताईवान वेटेड 0.53 टक्के आणि कोस्पी 0.58 टक्क्यांनी मजबूत झाला.
ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने मागणी घटली आहे. तेल बाजारात उठाव नसल्याने किंमती कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल, कच्च्या तेलाच्या किंमती 89 डॉलर प्रति बॅरलच्या मागेपुढे आहे. तर अमेरिकन कच्चे तेल 83 डॉलर प्रति बॅरल आहे.
बँकिंग, फायनानशियल आणि आयटी शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे. बँक, फायनानशियल आणि आयटी इंडेक्स सध्या तेजीत आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.
बाजारात परदेशी गुंतवणूकदार (FIIs) परतले आहेत. 7 सप्टेंबर रोजी FIIs ने 758.37 कोटी रुपयांची खरेदी केली. गेल्या काही महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे परतले आहेत. तर जुलैपूर्वी गुंतवणूकदारांनी विक्रीचा डाव मांडला होता.