SBI FD | मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) मध्येच मोडता येत नाही. तसे केल्यास तुम्हाला दंड (Penalty) भरावा लागतो. परंतू एसबीआयच्या विशेष मुदत ठेव योजनेतून(SBI FD) तुम्हाला रक्कम काढता येते. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक छदामही दंड द्यावा लागत नाही. ही कोणती मुदत ठेव योजना आहे ते पाहुयात..
एसबीआयच्या या मुदत ठेव योजनेचे नाव मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम अथवा एसबीआई मोड्स (SBI MODS) असे आहे. ही योजना एक टर्म डिपॉझिट योजना आहे. ही योजना ग्राहकाच्या बचत अथवा चालू खात्याशी जोडल्या जाते.
या मुदत ठेव योजनेत ग्राहकाला कधीही रक्कम काढता येते. त्याने कालावधी पूर्ण होण्याअगोदर रक्कम काढल्यास ग्राहकाला कोणताही दंड द्यावा लागत नाही.
या योजनेतंर्गत कोणीही खाते उघडू शकते. सिंगल अथवा ज्वाईंट, लहान मुलांच्या नावे, संयुक्त हिंदू परिवार, संस्था, कंपनी, सरकारी विभागाही त्यांच्या नावे या योजनेत खाते उघडू शकते.
एसबीआय मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकांना सर्वसामान्य मुदत ठेव योजनेवर जे व्याज मिळते, त्यानुसारच व्याज दिल्या जाते. समजा, नेहमीच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज देण्यात येत असेल तर मल्टी डिपॉझिट योजनेतही 5.5 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्तीचे व्याज दिल्या जाते.
SBI च्या मल्टी ऑप्शन डिपॉझिटस्कीमचा कालावधी 1 ते 5 वर्षांचा असतो. या योजनेत पूर्ण रक्कमही काढता येते. खात्यातून रक्कम काढण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही. ग्राहकाला थेट खात्यातून, धनादेशाद्वारे किंवा एटीएमद्वारे ही रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
या मुदत ठेवीसाठी बचत खाते अथवा चालू खात्यात कमीतकमी, सरासरी शिल्लकी(Balance) ठेवावी लागणार आहे. ऑटो स्वीप सुविधेसाठी या खात्यात 35,000 रुपये बॅलन्स असणे गरजेचे आहे. या योजनेत 10,000 रुपयांपासून सुरुवात करता येते.