नवी दिल्ली : जुने लॅमिलेटेड आधार कार्ड (Aadhaar Card) वापरुन वापरुन अथवा वॉलेट, पर्समध्ये पडून पडून खराब होते. त्याला घडी पडते अथवा ते मळकट दिसते. गरजेच्यावेळी झेरॉक्स करायला गेले की, मग त्याची नक्कल काही येत नाही. तुम्हाला पण याच अडचणीचा सामना करावा लागत असेल तर आता काळजीचं कारण नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक जोरदार पर्याय दिला आहे. हे आधार कार्ड हुबेहुब एखाद्या क्रेडिट कार्डसारखं दिसेल. हे आधार कार्ड तयार करण्याचा खर्च ही अवघा 50 रुपये आहे. हे कार्ड मिळविण्यासाठीची प्रक्रिया पण अत्यंत सोपी आहे.
एटीएमकार्ड सारखं मजबूत
12-अंकी ओळख क्रमांक असलेले आधारकार्ड आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. आधार कार्डवर लिहिलेल्या 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांकामध्ये नागरिकांची सर्व आवश्यक माहिती असते. त्यात त्यांचे बायोमेट्रिक्स नोंदवले जातात. आधार खराब होऊ नये यासाठी युआयडीआयने PVC आधार कार्डची (PVC Aadhar Card) सुविधा दिली आहे. हे आधार कार्ड एटीएम कार्डसारखं मजबूत असतं.
50 रुपयांत PVC आधारकार्ड घरी
PVC आधार कार्ड अवघ्या 50 रुपयांमध्ये तयार होते. हे कार्ड खराब होत नसल्याने त्याची प्रिंट पण चांगली येते. 50 रुपयांत करासह कुरिअर शुल्काचा समावेश असतो. पीव्हीसी आधार कार्ड तयार करण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला आधारच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
काय आहे प्रक्रिया