नवी दिल्ली : मालमत्ता कराविषयी (Property Tax) तुम्हाला नक्की माहिती असेल. मालमत्ता कर भरण्यासाठी लोकांचा फार कमी कल असतो. त्यांना त्याचे फायदे माहिती नसल्याने ते अनेकदा मालमत्ता कराची नोटीस मिळेपर्यंत कर भरत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थाकडे हा कर जमा करावा लागतो. स्थावर मालमत्तेवर या कराची आकारणी केली जाते. या कराला रिअल इस्टेट टॅक्स म्हणूनही ओळखले जाते. या कराचा उपयोग रस्ते, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सेवांच्या निधीसाठी करण्यात येतो. प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे घर मालकाला आणि तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला फायदा होतो. पण मालमत्ता कर भरण्याचे फायदे पण आहेत. तुम्ही घरबसल्या मालमत्ता कर भरु शकता. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासंबंधीच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मोबाईलद्वारे, ऑनलाईन, जवळच्या कार्यालयात जाऊनही तुम्हाला मालमत्ता कर भरता येतो.
काय आहे मालमत्ता कर
मालमत्ता कराला हाऊस टॅक्स या नावाने पण ओळखले जाते. हा कर स्थानिक स्वराज्य संस्था जसे की, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका याद्वारे जमा करण्यात येतो. स्थावर मालमत्तेवर हा कर लावण्यात येतो. हा कर सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्तांवर लावण्यात येतो. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असतो. रिकाम्या, मोकळ्या प्लॉटवर हा कर लावण्यात येत नाही.
प्रॉपर्टी कर भरण्याचे अनेक फायदे
स्थावर मालमत्तेवरील कर स्थानिक स्वराज्य संस्था वसूल करते. त्याचा वापर स्थानिक नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी करण्यात येतो. यामध्ये रस्ते, सीवेज सिस्टम, पथदिवे, बगिचे आणि इतर सोयी-सुविधांवरील खर्चासाठी होतो.तुमच्या मालमत्तेनुसार हा कर निश्चित करण्यात येतो. जर तुम्ही वेळेवर हा कर जमा केला तर तुम्हाला दंड होत नाही. दंडाची रक्कम करात जमा होत नाही. वार्षिक आधारावर हा कर भरावा लागतो. हा कर जमा करताना तुम्हाला उशीर झाला तर 2 टक्के भूर्दंड बसतो.
मालमत्ता कर कुठे भरणार
मालमत्ता कर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करुन शकता. संबंधित बँकांमध्ये पण ही सुविधा देण्यात येते. काही पतसंस्था अशा प्रकारची सुविधा देते. त्यासाठी तुम्हाला मालमत्ता कर क्रमांक द्यावा लागतो. सध्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा नागरिकांना फायदा होतो. तुम्हाला ठिकाण, वय, मालकाचे निव्वळ उत्पन्न, मालमत्तेचा प्रकार इत्यादी आधारे मालमत्ता कर भरण्यात सूट मिळते. तसेच एकदाच कर भरल्यास काही नगरपालिका, महानगरापालिका मोठी सूट पण देतात.