Demat Account | शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. त्यांनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन केले नसेल तर डीमॅट खाते (Demat Account) हाताळणे अडचणीचे ठरेल. राष्ट्रीय शेअर बाजाराने (National Stock Exchange) 14 जून 202 रोजी परिपत्रक काढले होते. त्यात 30 सप्टेंबरपर्यंत टू फॅक्टर ऑथेंटिकेशन(two-factor authentication) करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.
NSE ने दिलेल्या माहितीनुसार, खातेदारांना डिमॅट खात्यात लॉगइन करण्यासाठी
बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फॅक्टर वापरावे लागते. दुसरा मार्ग हा नॉ़लेज फेक्टरचा आहे. पासवर्ड अथवा पिनच्या माध्यमातून खातेदार लॉग इन करतो. वन टाईम पासवर्ड (OTP), सिक्युरिटी टोकन यामाध्यमातूनही लॉग इन करता येते.
ईमेल आणि एसएमएस या दोन्ही माध्यमातून ओटीपी मिळेल. त्याआधारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन शक्य होईल. तसे न झाल्यास पासवर्ड, ओटीपी, पिन, सिक्युरीटी टोकन, युजर आयडी यांचा वापर करुन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करावे लागेल.
NSE च्या परिपत्रकानुसार, 30 सप्टेंबर 2022 पूर्वी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (TOTP 2Factor) करणे आवश्यक आहे. त्याआधारे गुंतवणूकदाराने डीमॅट खात्यात लॉगिन करणे अनिवार्य आहे.
NSEने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची प्रक्रिया सांगितली आहे. त्यानुसार, टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी ईमेल आणि एसएमएस माध्यमातून ओटीपी मिळेल. नेटवर्क एररमुळे ही प्रक्रिया खंडीत झाल्यास पासवर्ड, ओटीपी, पिन, सिक्युरीटी टोकन, युजर आयडी यांचा वापर करता येईल.
National Securities Depository Limited (NDSL) and Central Depository Services (CDSL) यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोविड -19 दाखल होण्यापूर्वी म्हणजेच मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात 4.09 कोटी डीमॅट खाती होती. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात हा आकडा 6 कोटींवर पोहचला.आता हा आकडा 10 कोटींच्या पुढे गेला आहे.