मुंबई : आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सहा ते आठ तास झोप गरजेची आहे. डॉक्टर (doctor) सुध्दा हेचं सांगतात. तुम्हाला हे सुध्दा चांगलचं माहित आहे की, एखाद्या दिवस तुम्ही कमी झोपला, तर तुमचा पुढचा दिवस अधिक भयानक पद्धतीचा असतो. दिवसभर (viral news) कोणत्याही गोष्टीत तुमचं मन लागत नाही. कोणताही माणूस झोपल्याशिवाय व्यवस्थित राहू शकत नाही. असं म्हटलं जातं की, माणूस न झोपता ११ दिवस जिवंत राहू शकतो. परंतु आज आम्ही एका वेगळ्या माणसाची गोष्ट (Thai Ngoc) सांगणार आहोत. जो माणूस आतापर्यंत झोपला नाही, तरी सुध्दा जिवंत आहे. हे तुम्हाला ऐकायला सुध्दा कसतरी वाटत असेल, परंतु हे खरं आहे.
या व्यक्तीचं नाव थाई एनजोक (Thai Ngoc) असं आहे. ती व्यक्ती वियतनाम येथे राहणारी आहे. ही व्यक्ती मागच्या ६० वर्षापासून झोपलेली नाही अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. ही व्यक्ती दिवस आणि रात्र जागी असते. सध्या त्या व्यक्तीचं वय ८० आहे. तरी सुध्दा ती व्यक्ती एकदम फीट आहे आणि स्वत:ची कामं स्वत:करतो. थाई एनजोक म्हणतो की मागच्या ६१ वर्षांपासून झोपला नाही. त्याचबरोबर त्यांची मुलं सुध्दा सांगत आहेत की, अनेक वर्षांपासून आम्ही त्यांना झोपल्याचं पाहिलं नाही.
ज्यावेळी त्या व्यक्तीचं वय १८ होतं. त्यावेळी त्यांना एक दिवस अधिक ताप आला होता. त्यावेळी त्या तापाने त्यांची झोप उडली होती. त्यांना सुरुवातीला असं वाटलं होतं की त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं त्यांना झोप येत नाही. परंतु त्यांनी तब्येत ठीक झाल्यानंतर सुध्दा त्यांना नीट झोप आली नाही. त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार केले. पण त्यांना कधीचं झोप आली नाही. त्यांची झोप कायमची का उडाली हे सुध्दा डॉक्टरांना अद्याप समजलेलं नाही.
यूट्यूबर ड्र्यू बिन्स्की (Drew Binsky) यांनी काही दिवसांपुर्वी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितलं की, मी काहीवेळा झोपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना झोप येत नाही. त्यांनी काही औषध घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुस्ती आली पण झोप आली नाही