नवी दिल्ली : आपल्या देशात अशी अनेक लोकं आहेत. जी लग्न (Married man) केल्यानंतर सुध्दा स्वत:ला एकटे समजतात. त्यामुळे ते काहीवेळेला त्यांचं बाहेर एक अफेअर सुध्दा ठेवतात. त्याची माहिती त्यांच्या पत्नीला नसते. ज्यावेळी आपल्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे अशी माहिती पत्नीला समजली जाते. त्यावेळी ते विभक्त (divorce) होतात. अशी अनेक प्रकरण आपल्याला आपल्या आजूबाजूला किंवा घरात पाहायला मिळतात. परंतु एक तरुणी अशी आहे की, ती लग्न झालेल्या लोकांच्या आयुष्यात सरोगसी पत्नी (Surrogate Mother)बनून चांगले दिवस आणण्याचे काम करीत आहे. त्या मुलीचं असं मत आहे की, ती काम करीत आहे. काही लोकांच्या बायका जे काम करीत नाहीत. ते काम ती मुलगी करीत आहे.
त्या मुलीचं नाव बाबी पालोमास (Babi Palomas) असं आहे. ती मुलगी ब्राझील देशातील साओ पाउलो या भागात राहते. तिचं वय 24 आहे. बाबी पालोमास ही लग्न झालेल्या पुरुषाची सरोगसी पत्नी बनते. ती स्वत:ला काही तास किंवा काही दिवसांसाठी लग्न झालेल्या पुरुषांसोबत राहते. काही लोकं अशा महिलांच्या शोधात असतात. जी महिला त्यांचे शॉक पूर्ण करेल. कारण त्यांच्या बायका हे काम करण्यास नकार देतात. ती तरुणी या कामाचं त्या पुरुषांकडून खूप मोठे पैसे घेते. ती तरुणी लग्न झालेल्या पुरुषाकडून या कामाचे 30 हजार डॉलर म्हणजे २४ लाख रुपये घेते.
न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, पालोमास म्हणते की, मी असे काम करते की, ते करायला त्याच्या लग्न झालेल्या पुरुषांच्या बायका घाबरतात. हे काम म्हणजे फुटबॉल मॅच पाहताना कसल्याही गोष्टीची तक्रार न करणे. ती तरुणी डिजीटल माध्यमातून लोकांशी संपर्क साधत असते. लोकं त्या तरुणीला १२ तास किंवा २४ तासांसाठी खरेदी करतात. ती तरुणी त्या लोकांच्या भावना पूर्ण करते. ती म्हणते की, मी कोणत्याही लोकांच्या घरी कधी गेली नाही. त्याच्याशी फक्त ऑडिओ कॉल आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहते.
लग्न झालेल्या पुरुषाचं एकटेपण दूर करते
त्या तरुणीचा ओन्लीफॅन नावाचा एक ग्रुप सुध्दा आहे. त्या ग्रुपमध्ये लोकं त्या तरुणीशी खूप खुलून चर्चा करते. त्याचबरोबर लोकं त्या तरुणीशी त्यांच्या आयुष्याबाबत चर्चा करतात. ती सांगते की, त्यावेळी तिला समजते की समोरची व्यक्ती लग्न झालेली आहे आणि त्याचं कुटुंब आहे. त्या लोकांचं ती तरुणी एकटेपण दूर करते आणि त्यांच्याकडून मोठे पैसे घेते.