नवी दिल्ली : शाळेतील विद्यार्थ्यांचे (STUDENT VIDEO) किंवा मुलाचे सोशल मीडियावर अनेक चांगले व्हिडीओ (SOCIAL MEDIA VIRAL VIDEO) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात. त्यामुळं ते व्हिडीओ लोकं वारंवार पाहत राहतात. काही व्हिडीओ जुने असतात, त्यामुळे आपल्या आठवणी कायम जाग्या राहतात. काही व्हिडीओ (TRENDING VIDEO) इतके हटके असतात की, लोकांना ते व्हिडीओ पाहून एक प्रकारचा धक्का बसतो. तर काही लोकांना प्रचंड आनंद होतो. सध्या असाचं एक व्हिडीओ लोकांच्या चर्चेत आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त सुध्दा वेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. ते करीत असताना विद्यार्थी अधिक आनंदी होतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षणा व्यतिरिक्त फक्त शाळेतील इतर गोष्टी अधिक आवडतात. काहीवेळा एखाद्या कार्यक्रमात अधिक विद्यार्थी सहभागी होतात. या सगळ्या गोष्टी फक्त खासगी शाळेत पाहायला मिळतात असं तुम्हाला वाटतं असेल, तर हे पुर्णपणे चुकीचं आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र नाचत आहेत. हे पाहिल्यानंतर तुमचा सरकारी शाळेतील शिक्षकांवर नक्की विश्वास बसेल.
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक सरकारी शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमासाठी डान्स शिकवत आहे. ते विद्यार्थी सुध्दा मजा घेत हे सगळं शिकत आहेत. हा पहिला व्हिडीओ नाही, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या चांगल्या कृतीचे अनेक व्हिडीओ पाहिले जातात.
कमाल की वीडियो है. सरकारी स्कूलों के शिक्षक अगर ठान ले तो तस्वीर बदल सकती है.
इस टीचर को देखिये, कैसे बच्चों को फुल एनर्जी में डांस सीखा रहे हैं. pic.twitter.com/K84WZR0do1— Priya singh (@priyarajputlive) August 24, 2023
सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्स प्रिया सिंह नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हि़डीओ 58 सेकंदाचा आहे. १२ हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा करीत आहेत. एक नेटकऱ्याने लिहीले आहे की, सगळ्या शिक्षकांना वेळ मिळाला तर ते चांगलं काम करतील. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहीले आहे की, या व्हिडीओने माझं मन खूष केलं आहे.