मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे ऑनलाइन कोडे. हे कोडे सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. लोकांना ही कोडी सोडवायला फार आवडतात . ऑप्टिकल इल्युजनला चांगला प्रतिसाद मिळतो कारण लोक त्यात गुंतून राहतात. अनेक लोकांचं असं मत आहे की ऑप्टिकल इल्युजन व्यक्तीबद्दल बरंच काही सांगून जातं. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, त्याचं निरीक्षण कसं आहे हे सगळं यामुळे कळून येतं. लहानपणी आपण तोंडी कोडी सोडवायचो पण आता तोच प्रकार ऑनलाइन आलाय. लहानपणी ही कोडी सोडवताना आपण समोरच्याचं लक्ष विचलित करायला मोठमोठ्याने 1,2,3… 10 असं म्हणायचो. आता या ऑनलाइन कोड्यात देखील तेच आहे यात सुद्धा तुम्हाला एक ठराविक वेळ दिला जातो. या वेळेत तुम्हाला हे कोडे सोडवायचे असते.
हे चित्र नीट बघा. सध्या हे कलिंगडाचे चित्र खूप व्हायरल होतंय. आता हेच कोडे आहे आणि यात तुम्हाला काय शोधायचं आहे आम्ही सांगतो. या चित्रात तुम्हाला बिया नसलेली कलिंगडाची फोड शोधायची आहे. आता असं समजा की तुम्हालाच हे कलिंगड खायचं आहे आणि पटकन उत्तर शोधा. जितक्या लवकर तुम्ही या कलिंगडाच्या फोडी शोधून दाखवल तितकं तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे असं आपण समजू. तुम्हाला हे उत्तर मोजून 10 सेकंदात शोधायचं आहे.
या चित्रात सगळीकडे कलिंगड दिसतील. पण तुम्हाला बिया नसलेलं कलिंगड शोधायचं आहे आणि हेच कोडे आहे! या चित्रात अशा 3 फोडी आहेत ज्यात बिया नाहीत. नीट निरखून पाहिलं तर उत्तर सापडेल. तुम्हाला याचं उत्तर दिसलं का? जरा नीट बघा, सगळ्या बाजूने नजर फिरवा. पटकन सापडलं तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. ऑप्टिकल इल्युजनचे चित्र डोळे फिरवतं, माणूस इतका गोंधळून जातो की काहीच कळत नाही. हे चित्र देखील तसेच आहे. गोंधळून टाकणारे आहे. जर तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर हरकत नाही आम्ही खाली तुम्हाला उत्तर दाखवत आहोत.