Speed Train : हवेशी गप्पा कसल्या, थेट हवेतच उडते ही ट्रेन! स्पीड इतका की, पापणी लवताच…

| Updated on: May 26, 2023 | 8:36 PM

Speed Train : देशात आता कुठे भारतीय रेल्वे हवेशी गप्पा गोष्टी करत आहे. पण या देशातील ट्रेन हवेशी नाही तर वेगाशी गप्पा गोष्टी करत आहे. जाणून घ्या काय आहे स्काय ट्रेन...

Speed Train : हवेशी गप्पा कसल्या, थेट हवेतच उडते ही ट्रेन! स्पीड इतका की, पापणी लवताच...
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा (Indian Railway) विस्तार फुल स्पीडने होत आहे. राजधानी-शताब्दी अशा ट्रेन आता इतिहास ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express), बुलेट ट्रेनच्या देशात चर्चा रंगल्या आहेत. देशातील रेल्वेचा वेग वाढला आहे. भारतीय रेल्वे अजूनही रुळावरुन धावतात. आता तुम्ही म्हणाल मग रेल्वे रुळावरुन नाही धावणार तर मग काय हवेतून उडणार का? तर याचं उत्तर हो असंच आहे. या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण आता हवेतून उडणारी ट्रेन दिसणार आहे. म्हणजे ही ट्रेन हवेत तरंगत धावेल. पण असं नशीब सध्या भारतीय प्रवाशांचं नाही, तर हा देश ही किमया साधणार आहे.

चीनने केला कारनामा
ही गोष्ट चीनने शक्य करुन दाखवली आहे. येथे ट्रेन रुळावरुन नाही तर हवेत तरंगत सुसाट धावणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच चीनने हा कारनामा करुन दाखवला आहे. लो-व्हॅक्यूम पाईपलाईनमध्ये चालणारी अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्लेव ट्रेनचे चीनमध्ये यशस्वी परिक्षण करण्यात आले. ही ट्रेन जमिनीपासून वर एका खासप्रकारच्या तंत्राच्या सहायाने लटकत धावेल. सध्या ही रेल्वे एका ट्रॅकवर धावत आहे. पण लवकरच या प्रकल्पाचा विस्तार संपूर्ण चीनमध्ये करण्यात येणार आहे. रेड ट्रेन असे या ट्रेनचे नाव आहे. येथील नागरिक तिला स्काय ट्रेन असे म्हणतात. हेच नाव चीनमध्ये लोकप्रिय झाले आहे.

हे सुद्धा वाचा


याठिकाणी झाली सुरुवात
चीनच्या जिंगगुओ काऊंटीमध्ये पहिली मॅग्लेव लाईन सुरु झाली आहे. 2600 फुट ट्रॅकवर येथे स्काय ट्रेन सुसाट पळत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. ही ट्रेन 80.5 प्रति तास या वेगाने धावत आहे. शक्तिशाली चुंबक शक्तीमुळे ही ट्रेन हवेत लटकून धावते. ही ट्रेन जमिनीपासून 33 फुटावर धावते. सध्या ही मॅग्लेव लाईन व्यावसायिक वापरासाठी सुरु आहे. सध्या ही स्काय ट्रेन शंघाईच्या पुडोंग एअरपोर्ट ते लोंगयांग रोड स्टेशन यांना जोडते.

अवघ्या 7 मिनिटात …
चीनच्या जिंगगुओ काऊंटीमध्ये पहिली मॅग्लेव लाईन सुरु झाली आहे. 2600 फुट ट्रॅकवर येथे स्काय ट्रेन सुसाट पळत आहे. शक्तिशाली चुंबकांच्या सहायाने हा प्रयोग सुरु आहे. ही ट्रेन जोरदार धावते. ही ट्रेन 30 किमीचे अंतर केवळ 7 मिनिटात कापते. या ट्रेनमध्ये एकावेळी 88 जण प्रवास करु शकतात. पण सध्या ही ट्रेन व्यावसायिक वापरासाठी करण्यात येत आहे.