मुंबई : उत्तर प्रदेश, (Uttar Pradesh) गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपनं (bjp) मोठं यश मिळवलंय. उत्तर प्रदेशात भाजपला 273 जागा मिळाल्या असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला. तर समाजवादी पक्षाला 125 जागा, काँग्रेसला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागलं. बहुजन समाजवादी पक्षाला 1 जागा आणि इतर पक्षांनी 2 जागा जिंकल्याचं निवडणुकीच्या निकालातून समोर आलंय. तिकडे गोव्यात 40 विधानसभेच्या जागांपैकी भाजपला 20, काँग्रेसला 12, आणि अपक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांना 8 जागा मिळाल्या. पंजाबमध्ये ‘आप’नं इतिहास रचला असून 92 जागांवर त्यांचा घवघवीत विजय झाला. तर काँग्रेसला पंजाबमध्ये (punjab) सत्तेत असूनही 18 जागांवर समाधान मानावं लागलं. इतर प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांना 7 जागा जिंकता आल्या. उत्तराखंडमध्ये 70 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक 47 जागा एकट्या भाजपनं जिंकल्या. तर 19 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं. इतर पक्षांनी 4 जागा जिंकल्या. मणिपूरमध्ये भाजपनं सर्वाधिक 32 जागा जिंकल्या, तर एनपीपी या पक्षानं 7, काँग्रेसनं 5 आणि इतर प्रादेशिक पक्षांसह अपक्षांना मिळून 16 जागा जिंकता आल्या. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा (Memes) वर्षाव होताना दिसून आला.
उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपनं मोठा विजय मिळवला. या विजयाचा भाजप कार्यकर्ते देशभरात जल्लोष करताना दिसून आले. तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्सचा वर्षाव केल्याचं दिसून आलं. वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर दिसून आले. या मीम्समध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अभिनेता अक्षय कुमार यांच्या फोटोंना घेऊन हे मीम्स नेटकऱ्यांनी बनवले होते.
#MahaVikasAghadi Right now !#ShivSena #NCP #Congress pic.twitter.com/F2XNaHbh65
— Siddharth Shirole (@SidShirole) March 10, 2022
उत्तर प्रदेशात भाजपनं दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. तर दुसरीकडे काँग्रेसनं आश्वासनांचा पाऊस पाडून आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी मतदारांना विश्वास देऊनही त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. हाच मुद्दा धरुन नेटकऱ्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर गंमतीशिर मीम्स बनवले.
Now who did this?#BJP #BJPAgain #YogiAdityanath #AkhileshYadav pic.twitter.com/YsohJxgzlu
— Aditya Raj (@its_me_addy08) March 10, 2022
Scene right now in UP : #up #ElectionResults #BJPWinningUP pic.twitter.com/xt1HZNKaTj
— Being Comrade☮️ (@comrade_knock) March 10, 2022
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आघाडीवर होते. त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची साथ होतीच. पण, त्यांचा भाजपला रोखण्याचा प्रयत्न पुरता फसल्याचं दिसून आलं. आता नेटकऱ्यांना संजय राऊतांवरही मीम्स बनवून त्यांनाही ट्रोल केलं. सोशल मीडियावर अनेक रंजक मीम्सही दिसून आले. तर अनेक मीम्समधून राजकीय पक्षांची टिंगल उडवल्याचं दिसून आलं.
Meanwhile #sanjayRaut claimed winning 403 seats in U.P. ??#UPElection2022 pic.twitter.com/414Z53qm0I
— RamLal2 (@Ramlal217) March 8, 2022
इतर बातम्या