राजस्थान | 28 ऑगस्ट 2023 : आई बननं कोणत्याही महिलेचं स्वप्न असतं..आई बनण्यासाठी आणि मुलांचे भरणपोषण करण्यासाठी प्रत्येक मातृत्व आसुसलेलं असतं. आपलंही चारचौघासारखं मुलांनी घर भरलेलं असावं, असं प्रत्येक दाम्पत्याला वाटत असतं. परंतू हल्ली उशीरा होणारी लग्नं, ताणतणाव आणि वाढतं प्रदुषण यामुळे मुलं होणं दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. अशात जर चार वर्षे घरात पाळणा हलला नाही तर घरातील महिलेलाच लोक दुषणं देऊ लागतात. अशात एका दाम्पत्या लग्नानंतर चार वर्षे काही मुलबाळ होत नव्हतं. परंतू त्यानंतर जे झालं त्यानं घरात तारांबळ उडाली.
तिचे लग्न झाल्यानंतर चार वर्षे काही ती आई बनू शकली नाही. त्यामुळे नाराज असतानाच ती गर्भवती राहीली. आता आपल्यालाही आता बाळ होणार अशी ती स्वप्न पाहू लागली. परंतू तिची प्रसूती झाली तेव्हा तिला चक्क चार गोंडस बाळं झाली. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यामधील वजीरपूरा गावात ही आगळी घटना घडली आहे. लग्नानंतर तिला चार वर्षे मुल होत नव्हतं. परंतू आता एकसाथ चार बाळं जन्माला आल्याने हे दाम्पत्य आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले आहेत. एका खाजगी रुग्णालयात रविवारी सायंकाळी प्रसव कळा सुरु झाल्याने या महिलेला भरती करण्यात आले होते. डॉक्टर शालीनी अग्रवाल यांनी सांगितले की या चारही बाळांचे प्रकृती उत्तम आहे.
या चार बाळांची तब्येत ठणठणीत आहे –
या आईला आणि तिच्या बाळांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे, ही महिला दोन महिन्यांची गर्भवती असताना डॉक्टरांनी तिच्या गर्भात चार भ्रूणांचा विकास होत असल्याचे तिला डॉक्टरांनी तपासून सांगितले होते. चार महिन्यानंतर गर्भपाताची शक्यता असल्याने तिच्यावर विशेष उपचार करण्यात आले होते. एखाद्या महिलेने चार मुलांना जन्म दिल्याची टोंक जिल्ह्यातील हे तिसरे प्रकरण आहे. या आधी दोन प्रकरणात एकात दोन नवजात बाळांची तर दुसऱ्या प्रकरणात एक नवजात बाळाचा जन्मानंतर मृत्यू झाला होता अशी माहीती उघडकीस आली आहे.
मेडीकल सायन्सच्या इतिहासात जुळे किंवा तिळे होणे खूपच वेळा पाहायला मिळते. परंतू एकाच वेळी चार किंवा त्यापेक्षा मुले होणे विरळ आहे. डॉक्टरांच्या मते दहा लाख प्रसूती पैकी एखाद्यावेळी चार मुले एकाच वेळी जन्माला येते. अनेक वेळा चार मुलांपैकी एक किंवा दोन बाळं दगावण्याचाही धोका असतो. परंतू या प्रकरणात चारही बाळांची प्रकृती उत्तम आहे.