तळपत्या उन्हात गारव्यासाठी तो स्वत:सोबत घेऊन फिरतोय केसांचा फॅन … बिग बींनीही शेअर केला मजेशीर व्हिडीओ

| Updated on: May 17, 2023 | 4:36 PM

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूपच मजेशीर आहे.

तळपत्या उन्हात गारव्यासाठी तो स्वत:सोबत घेऊन फिरतोय केसांचा फॅन ... बिग बींनीही शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Follow us on

मुंबई : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे बॉलिवूडचा मेगास्टार असून सध्या ते त्यांच्या एका फोटोमुळे चर्चेत आहेत. ते एका बाईकवर व्यक्तीच्या मागे बसले असून दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सेलिब्रिटींचे वादांशी नातं अतूट असतं. दरम्यान, बिग बी यांनी इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो या वादापेक्षा वेगळा आहे आणि तो खूपच मजेशीरही आहे.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. त्यांच्या फोटो-व्हिडिओ किंवा प्रमोशनशी संबंधित पोस्ट्स व्यतिरिक्त, ते अनेक वेळा विचित्र व्हिडिओ देखील पोस्ट करतात, जे व्हायरल होऊ लागतात. आता त्यांनी असाच एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक गणवेशधारी व्यक्ती रस्त्यावरून चालताना दिसत आहे. त्याचा गणवेश पोलिसांच्या गणवेशासारखा दिसतो पण प्रत्यक्षात तो पोलिस आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. अनेक वेळा सुरक्षा रक्षक किंवा इतर व्यवसायाशी संबंधित लोकही असा ड्रेस घालतात.

गोलाकार डोकं फिरवत चाललेला इसम

व्हिडिओतील व्यक्तीच्या डोक्यावर केस नाहीत, फक्त मागे एक लांब बो घातलेला आहे. तो त्याच्या केसांचा बो गोल-गोल फिरवत आहे, जे पंख्यासारखे गरगर फिरताना दिसते. ती व्यक्ती मुद्दाम डोके हलवत असल्याने त्याचे केसही वेगाने फिरत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अमिताभ यांनी लिहिले- “दिवसाच्या भीषण उन्हात, (ही) व्यक्ती स्वत:ला थंड करण्यासाठी स्वत:चा पंखा सोबत घेऊन बाहेर पडला आहे.”

 

व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून त्याला लाखो लाइक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो लोकांनी कमेंट करून त्यांचं मतही मांडलं आहे.  ” हे अद्भुत आहे ! फक्त त्याने टेक ऑफ करू नये (हेलिकॉप्टरसारखे) अशी मी प्रार्थना करतो” अशी कमेंट एका युजरने केली आहे.  तर  ” हे आत्मनिर्भर भारतचे उत्तम उदाहरण आहे ” अशी मजेशीर कमेंटही एकाने केली आहे.