नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ( WhatsApp ) मोबाईल एपच्या नव्या फिचरमुळे आता नव्या ग्रुप मेंबरला जबरदस्त फायदा होणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर जेव्हा तुम्ही कुणाला एड करता किंवा स्वत: ग्रुपमध्ये सामील होता. तेव्हा तुम्हाला मॅसेज करताना एक अडचण येत असते. कारण ग्रुपमध्ये नव्याने सामील होताना आधीचे मॅसेज तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे कोणत्या टॉपिकवर चर्चा सुरु आहे ते तुम्हाला काहीच समजत नाही. कारण व्हॉट्सअप ग्रुपवर ( whatsapp group ) नव्याने सामील होताना तुम्हाला मागची सगळी चॅटींग ( chatting ) पाहता येण्याची सोय आता होणार आहे. परंतू त्यातही अट ठेवण्यात आली आहे. कोणती ही अट पाहूयात…
व्हॉट्सअपच्या वापरकर्त्यासाठी एक नवीन फिचर येणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर नव्याने सामील झालेल्या ग्रुप मेंबरला आता आधीचे मॅसेज वाचता दिसावेत यासाठी नवीन फिचर येणार आहे. या नव्या फिचर्सचे नाव ‘रीसेंट हिस्ट्री शेअरिंग’ असे आहे. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवपर सामील होणाऱ्या नव्या मेंबर्सला जुने मॅसेज वाचता येणार आहेत, परंतू या फिचर्सच्या कंट्रोलचा अधिकार एडमिनकडे असणार आहे. त्यामुळे एडमिन ठरविणार कि नव्या ग्रुप मेंबरला जुने चॅटींग वाचायला द्यायचे के नाही ते एडमिनच्या हातात असणार आहे.
व्हॉट्सअपच्या नव्या अपडेटमुळे नव्याने व्हॉट्सग्रुपमध्ये सामील होणाऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र ग्रुप एडमिन्स जर या फिचर्सला लागू करायचे नसेल तर मात्र नव्या मेंबर्सला जुन्या चॅट दिसणार नाहीत. जेव्हा ‘रीसेंट हिस्ट्री शेअरिंग’ असे नाव असलेले हे फिचर्स ग्रुप एडमिन्स सुरु करतील तेव्हा नव्या मेंबर्सला गेल्या 24 तासांतील चॅटींग पाहायला मिळतील. या नव्या फिचरची माहीती व्हॉट्सअप डेव्हलमेंटवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाईट Wabetainfo ने शेअर केली आहे.
या नव्या अपडेटमुळे नवीन ग्रुप मेंबर्सना आधीच्या चॅट समजण्यासाठी संधी मिळणार आहे. तसेच त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे. सध्या हे फिचर केवळ बिटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होणार आहे. परंतू येत्या काळात सर्व युजर्सना देखील हे फिचर्स उपलब्ध होऊ शकणार आहे. बिटा युजर्स प्ले स्टोअरमधून व्हॉट्सअप व्हर्जन 2.23.18.5 बरोबर हे फिचर वापरता येईल.
अलिकडेच व्हॉट्सअपने एड्रॉइड बिटा युजर्ससाठी एक नवीन फिचर आणले होते. ज्याचे नाव मल्टी अकाऊंट लॉगिन असे आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स एकाच फोनमध्ये अनेक व्हॉट्सअप अकाऊंट खोलू शकतो. लवकरच हे फिचर लागू होणार आहे.