मुंबई : रिअलमीच्या युजर्ससाठी एक खुशखबर आहे. कंपनीकडून नुकताच रिअलमी सी33 (Realme C33) हा बजेट स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा नवीन फोन कंपनीने आपल्या बजेट सी सीरीजअंतर्गत लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या महत्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल AI कॅमेरा (camera) सेंसरसह लाँच करण्यात आला आहे. कमी किमतीतही या फोनचा लूक अतिशय स्टायलिश ठेवण्यात आला आहे. त्याच सोबत बजेट सेगमेंटमध्ये असूनही यात अत्याधुनिक फीचर्स (Advanced features) देण्यात आली आहेत. या लेखाच्या माध्यमातून त्याचे फीचर्स, भारतातील किंमत आदींविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
या रियलमी मोबाईल फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8999 रुपये आहे. फोनच्या 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देणाऱ्या मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. फोनचे तीन कलर व्हेरिएंट लाँच केले गेले आहेत, यात, ॲक्वा ब्ल्यू, सॅन्डी गोल्ड, आणि नाइट सीचा समावेश आहे. फोनची विक्री Flipkart व्यतिरिक्त Realme च्या अधिकृत साइटवर 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.