आता iPhone मध्ये युएसबी टाईप- C चार्जरची सुविधा मिळणार ! एका अहवालातून बातमी झाली उघड

| Updated on: Aug 23, 2023 | 7:53 PM

आयफोनच्या नवीन iPhone - 15 या मॉडेलसह apple अनेक जुन्या आयफोनमध्ये USB-C चार्जिंग पोर्टची सुविधा आणू शकते.

आता iPhone मध्ये युएसबी टाईप- C चार्जरची सुविधा मिळणार ! एका अहवालातून बातमी झाली उघड
iPhone-15
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : आयफोन तुम्ही वापरला असेल किंवा पाहीला असला तर त्याचा चार्जिंग स्लॉट इतर कंपन्यांच्या मोबाईल फोनच्या तुलनेत वेगळा असतो. आयफोनमध्ये लाईटनिंग पोर्ट अस्तित्वात आहे. आता लवकरच त्यात बदल होऊ शकतो. कारण असे खात्रीलायक समजते की आपली खास ओळख असलेला चार्जिंग पोर्टला कंपनी कायमचे गूडबाय करु शकते. कंपनी आगामी iPhone -15 सिरीजसाठी USB टाइप – C ला स्वीकारु शकते. कंपनीच्या 2023 च्या आयफोन मॉडेलसह काही जुन्या आयफोनला देखील लाइनटनिंग पोर्ट ऐवजी USB-C पोर्ट लावू शकते.

आयफोनच्या नवीन iPhone – 15 या मॉडेलसह apple अनेक जुन्या आयफोनमध्ये USB-C चार्जिंग पोर्टची सुविधा आणू शकते. याबाबत apple कंपनीचे डेव्हलपर आणि लेखक एरोन यांनी ट्वीटर ( आता एक्स ) माहीती दिली होती. टीवीओएस 17 बीटा 5 कोडचे एनालिसिस करताना एरोन यांना दोन आयफोन मॉडेल मिळाले जे पहील्याच्या बीटा बिल्डमध्ये नव्हते.याशिवाय या दोन मॉडेल्सना जुन्या टीव्हीओएस सॉफ्टवेअर वेरिएंटमध्ये आढळलेल्या चार आयफोन-15 रेफरेन्स पासून वेगळे म्हटले जात आहे. असा अंदाज लावला जात आहे की सॉफ्टवेअरमध्ये आढळलेल्या नवीन आयफोन मॉडेल, आयफोन-14, 1 आणि आयफोन 14,9 मानक आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस आहेत. यात युएसबी – सी चार्जिंग पोर्टने सुसज्ज आहेत.

जून्या आयफोनला युएसबी-सी पोर्टची गरज काय ?

apple कंपनी जुन्या आयफोनला देखील लाइटनिंग पोर्ट ऐवजी टाईप-सी पोर्ट देईल की नाही याबाबत अजून नक्की सांगता येणार नाही. परंतू मोबाईल रिव्ह्यू करणारी कंपनी 91mobiles ने आपल्या अहवालात असे म्हटले आहे. जर हा अहवाल खरा असेल तर लवकरच तुम्हाला तुमच्या नव्या आयफोन-15 मध्ये टाईप-सी पोर्ट दिसेल. साल 2020 मध्ये एका नियम आणण्यात आला होता त्यात कंपन्यांना सी पोर्ट लावण्याचे आदेश दिले होते. हे आयफोन-15 सिरीज पासून नवीन USB-C ट्रान्सफर होण्यास कंपन्यांना लागू केलेले हे कठोर नियम असतील असे म्हटले जात आहे.