यातला पहिला आहेे Coursera. या अॅपमध्ये हजारो आर्टिफीशीअल इंटीलेजन्स अभ्यासक्रम आहेत. हे अॅप अनेक विद्यापीठांशी संलग्न आहे. यासह, याचे Google, Stanford, IBM आणि इतर अनेक संस्थांशी संलग्न आहे.
यानंतर UpGrad या अॅपने देखील तुम्ही AI टेक्नोलाॅजी शिकू शकता. यामध्ये अनेक आर्टिफीशीअल इंटीलेजन्स अभ्यासक्रम आहेत. या अॅपच्या मदतीने, वापरकर्त्याला थेट उद्योग तज्ञांकडून शिकायला मिळते. या अॅपमध्ये अनेक विषय आणि एक्ससाईज आहेत.
Udemy हे एक असे यूजर फेण्डली अॅप आहे. बहुतेक लोकांना याबद्दल माहिती आहे. या अॅपवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अनेक कोर्सेस आहेत. जर तुम्हाला या क्षेत्रात व्यवसाय करावायचा असेल, तर हे अॅप तुम्हाला मशीन लर्निंग आणि एआयशी संबंधित तंत्रज्ञानाबद्दल सांगेल.
Simplilearn हे अॅप मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP, कॉम्प्युटर व्हिजन, जनरेटिव्ह एआय, स्पष्ट करण्यायोग्य AI, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, ChatGPT आणि बरेच काही शिकवते. जर तुम्हाला एआय आणि एमएलमध्ये करिअर करायचे असेल तर हे अॅप तुम्हाला सर्व काही शिकवेल.
Google Cloud या अॅपमध्ये AI तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक कोर्सेस आहेत. वापरकर्ते येथे केवळ शिकत नाहीत तर तंत्रज्ञान वापरण्यास देखील शिकतात.