बुडापेस्ट | हंगरीची राजधानी बुडापेस्ट वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताचा ‘गोल्डन बॉय’ अशी ओळख असलेल्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे. नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये पाकिस्तानच्या अशरफ नदीम याचा खुर्दा उडवला. नीरज गोल्डन मेडल जिंकेल, असा विश्वास साऱ्या देशाला होता. नीरजने भारतीयांच्या विश्वास खरा ठरवला आणि पुन्हा एकदा त्याने स्वत:ला गोल्डन बॉय असं का म्हणतात हे सिद्ध करुन दाखवलं.नीरजने गोल्ड मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
नीरज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं. नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला. तसेच पाकिस्तानच्या अशरफ नदीम याने दुसरा क्रमांक पटकावत सिल्वहर मेडलची कमाई केली.
नीरज चोप्रा याचा ऐतिहासिक थ्रो
.@Neeraj_chopra1 brings home a historic gold for India in the javelin throw 👏#WorldAthleticsChamps pic.twitter.com/YfRbwBBh7Z
— World Athletics (@WorldAthletics) August 27, 2023
नीरजने 2016 मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती नीरज तेव्हा अॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला होता. आता 7 वर्षांनी नीरजने इतिहासाची पुनरावृत्ती करत सिनिअर लेवलला वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.