नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील (CWG2022) सर्व पदक विजेत्यांची भेट घेतली. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेतमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय दलाशी संवाद साधला. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांची त्यावेळी उपस्थिती होती. क्रीडा क्षेत्रातील आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. तसेच शरथ कमल, पीव्ही सिंधू, मीराबाई चानू आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे खूप कौतुक केले. याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होऊन भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
Elated to interact with our CWG 2022 contingent. Entire nation is proud of their outstanding achievements. https://t.co/eraViqKcnl
हे सुद्धा वाचा— Narendra Modi (@narendramodi) August 13, 2022
बर्मिंगहॅमची वेळ भारतापेक्षा पुर्णपणे वेगळी होती, असे असतानाही सामना पाहण्यासाठी लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहायत होते. यासाठी अनेक चाहत्यांनी गजर देखील लावला होता. आम्हाला तुमचा किती अभिमान आहे हे त्यातून स्पष्ट दिसून आले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने सुवर्णकाळ आणला आहे. खेलो इंडियाच्या मोहिमेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं देखील मोदींनी बोलताना सांगितलं.
Before commencement of #CommonwealthGames, I had told you & promised you in a way that when you come back we’ll celebrate ‘Vijayotsav’ together. I was confident that you’ll come back victorious, I had also thought of meeting you even if I would be busy & celebrate Vijayotsav: PM pic.twitter.com/tRUL0GsF45
— ANI (@ANI) August 13, 2022
झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत यावर्षी भारतीय खेळाडूंची कामगिरी सर्वोत्तम केली आहे. कॉमनवेल्थ हेम्स असो किंवा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप असो, प्रत्येक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी आपले नाव उंचावले आहे. जे खेळाडू यावेळी कॉमनवेल्थमध्ये जाऊ शकले नाहीत त्यांनी पुढच्या वेळेची तयारी करावी, तसेच त्यांनी सुध्दा तिथं जावे असे वाटतं आहे असं खेळाडूंना संबोधिक करताना नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच देशासाठी पदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन केले आहे. आजच्या कार्यक्रमात पदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अनेक ट्विट केले होते. ज्यांना पदक मिळालं नाही त्यांना पीएम मोदींनी शुभेच्छाही दिल्या होत्या. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुमारे 200 भारतीय खेळाडूंनी 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये पदकांसाठी स्पर्धा केली. राष्ट्रकुल 2022 मध्ये भारत 61 पदकांसह (22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य) चौथ्या स्थानावर आहे. कुस्तीने सहा सुवर्णांसह १२ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले तर वेटलिफ्टिंगमध्ये १० पदकांचा समावेश आहे.